Ahamdanagar

पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे या नामदार व्हाव्यात ः डॉ.यशवंत पाटणे यांचे स्व.दादापाटील राजळे स्मृती व्याख्यान मालेत सूतोवाच !

पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे या नामदार व्हाव्यात ः डॉ.यशवंत पाटणे यांचे स्व.दादापाटील राजळे स्मृती व्याख्यान मालेत सूतोवाच !

सुनिल नजन/अहमदनगर

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे या नामदार व्हाव्यात असे सूतोवाच साताऱ्याचे जेष्ठ लेखक,वक्ते, साहित्यीक प्राचार्य डॉ यशवंतराव पाटणे यांनी केले. ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथिल राजळे महाविद्यालयात सहकार महर्षी स्व.दादा पाटील राजळे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त स्मृती व्याख्यान मालेच्या उद्घाटनप्रसंगी प्रसंगी”जिवन त्यांना कळले हो”या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव-पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त सुभाषराव ताठे हे होते. स्व.दादापाटील राजळे यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून नंतर दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजधर टेमकर यांनी प्रास्ताविक केले. आमदार मोनिकाताई राजळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. नंतर पहिले पुष्प गुंफताना डॉ पाटणे यांनी दोन तास स्व.दादा पाटील राजळे यांच्या जिवनावरील प्रा.टेमकर सर यांनी लिहलेल्या पुस्तकातील स्व.भाऊंच्या चरित्राच्या माहितीचे दाखले देत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी डॉ युवराज सुर्यवंशी, आर. जे.महाजन, भास्करराव गोरे, रामकिसन काकडे,जेष्ठ नेते उद्धवराव वाघ,कुशिनाथ बर्डे, जे.आर.पवार, मिर्झा मन्यार,बाळासाहेब अकोलकर, रामदास म्हस्के सर,बाळासाहेब ताठे सर,बाबासाहेब बर्डे, बाबा पुढारी, सुनिल ओहळ,विक्रम राजळे,श्रीकांत मिसाळ, अशोक ताठेसर,शामराव गरड,सुभाष देशमुख, बाबासाहेब चोथे, नंदु आहेर,साधना म्हस्के, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन राजेंद्र इंगळे सर यांनी तर आभार प्रा.निर्मला काकडे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button