Ahamdanagar

डी.वाय.एस.पी.साहेब… पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या पी.एस.आय.च्या मुसक्या आवळा, नाही तर थेट विधानसभेत आवाज उठवू ?

डी.वाय.एस.पी.साहेब… पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या पी.एस.आय.च्या मुसक्या आवळा, नाही तर थेट विधानसभेत आवाज उठवू ?

नगर-नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी!

सुनिल नजन/अहमदनगर

नुकतेच महाराष्ट्राच्या विधानसभेत पावसाळी अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नर्हेडा यांच्या कडे जमीन व्यवहारात फसवणूक झाली म्हणून एक विधवा तरुणी न्याय मागण्या साठी आली होती. आलेल्या विधवा तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा संबंधित उपनिरीक्षका विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. त्याचा आवाज राहुरीचे आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी थेट महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करून बडतर्फ केले जाईल असे आश्वासन विधानसभेत दिले होते.नंतर या उपनिरीक्षकास तातडीने अटक करावी म्हणून अनेक मागासवर्गीय संघटनांनी राहुरी येथे आंदोलन ही केले होते.हे प्रकरण ताजे असताना आणि या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच नाशिक जिल्ह्यातील येवला पोलीस स्टेशनचे नांदगाव येथून नव्याने बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील यांनी शुक्रवार दिनांक ४/८/२०२३ रोजी पत्रकार देविदास बैरागी यांना शिविगाळ केली.म्हणून नगर-नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांनी थेट डीवायएसपी यांची भेट घेऊन इशारा देत सांगितले की डीवायएसपी साहेब पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या मुसक्या आवळा नाही तर थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवला जाईल असे सुनावले. या बाबदची घटना अशी की शुक्रवार दि.४ आँगष्ट २३रोजी पत्रकार देविदास बैरागी हे नाशिक जिल्ह्यातील येवला पोलीस स्टेशनला गेले होते. तेथे एका अनोळखी इसमाशी पत्रकार बैरागी हे बोलत होते. त्यावेळी तेथे नांदगाव येथून नव्याने बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील आले. आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करताच पत्रकार देविदास बैरागी यांना शिविगाळ करत पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्याचा प्रयत्न केला.बैरागी यांनी आपण पत्रकार आहोत अशी ओळख सांगूनही उपनिरीक्षक पाटील यांनी काहीही ऐकुन न घेता पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. आणि हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.पत्रकारांचा हा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर गाजत आहे.नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला पाहिजे अशी नगर-नाशिक जिल्ह्यातील पत्रकारांनी मागणी केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना जर पोलीस प्रशासनाकडून अशी हीन दर्जाची वागणूक मिळत असेल तर सर्व सामान्य नागरीकांचे काय?असा प्रश्न पोलिसांच्या कार्य पद्धतीवर उपस्थित केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब महाजन यांच्या कानावर संबंधित पत्रकारांनी ही घटना घातली असता त्यांनीही या पोलीस उपनिरिक्षकास पाठीशी घालत नव्यानं बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील हे नवीन आहेत त्यांना सांभाळून घ्या असा सल्ला दिला.येवला पोलीस निरीक्षकांनी या उपनिरीक्षकास पाठीशी घातल्यामुळे निफाडचे(dysp) उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांची जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला असता येवला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी पत्रकार बैरागी यांना केलेल्या शिविगाळ प्रकरणाची सखोल चौकशी करून, पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कँमेऱ्यातील फुटेज तपासून संबंधीत पोलीस उपनिरीक्षकावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन निफाड विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रकरणाचा बोध घेऊन जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ही पत्रकारांशी सौजन्याने वागणे आवश्यक आहे. तसेच पत्रकारांना योग्य ती माहिती उपलब्ध करून देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. आणि पत्रकारांनीही पोलीस स्टेशनमध्ये जाताना आपले आयडेंटी कार्ड गळ्यात असल्याची खात्री करून घेउनच पोलीस ठाण्यात प्रवेश केल्यास असे प्रसंग उद्भवनार नाहीत असे पोलीस उपअधिक्षक यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button