Erandol

आदिवासी भील समाजातील तरुणावर दरोडेखोर म्हणुन गुन्हा दाखल झाल्याने सी.बी.आय.मार्फत त्याची चौकशी करा अन्यथा महाराष्ट्रा भर रस्ता रोको आंदोलन जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांचा इशारा

आदिवासी भील समाजातील तरुणावर दरोडेखोर म्हणुन गुन्हा दाखल झाल्याने सी.बी.आय.मार्फत त्याची चौकशी करा अन्यथा महाराष्ट्रा भर रस्ता रोको आंदोलन जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे यांचा इशारा

रजनीकांत पाटील

प्रतिनिधी – एरंडोल भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पोलीस अधिक्षक अमळनेर विभाग यांना आदिवासी भील समाजातील तरुणावर दरोडेखोर म्हणुन गुन्हा दाखल झाल्याने त्या गुन्ह्याची चौकशी सी.बी.आय.मार्फत व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत निवेदन देण्यात आले असुन निवेदनात विठ्ठल रोहिदास भील रा. बोळे,ता.पारोळा, जि.जळगाव येथील आदिवासी भील समाजातील २२ वर्षीय तरुणाला व परिवारातील पत्नी अनिता व आई यांना जातीवाचक शिवीगाळ करुन कमरेच्या पट्ट्याने दि.२७/०९/२०२० रोजी गावातील दगडु भोजू गिरासे व ज्ञानेश्वर अनाभाया गिरसे यांनी मारहाण केली. दि.०१/१०/२०२० रोजी विठ्ठल रोहिदास भील यांनी पारोळा पोलिस स्टेशनला अट्रो सिटी चा गुन्हा दाखल केला.परंतु या गुन्ह्यातून सुटका होण्यासाठी दगडु भोजु गीरासे यांनी विठ्ठल रोहिदास भील यांचे विरुद्ध चोरी करणारे दरोडेखोर म्हणुन पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला.यात दगडु भोजु गीरासे यांची अट्रो सिटी अॅक्ट मधुन स्वतःची वाचण्याची चाल असल्याचे म्हटले असुन विठ्ठल रोहिदास बोरसे हे खरोखर दरोडेखोर असतील तर सी.बी. आय.मार्फत चौकशी करावी व योग्य न्याय मिळावा. जर ते यात दोषी नसतील तर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर अट्रो सिटी सोबतचे खोटे आरोप करण्याचा गुन्हा नोंदवून जास्तीत शिक्षा करावी अशी मागणी केली असुन शेवटी भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोरोना काळात सोशल distan चे नियम पाळत जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे,पारोळा तालुकाध्यक्ष रविंद्र वाघ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल सोनवणे,रमेश भील,रविंद्र भील,हरी भील,साहेबराव भील,नवनीत मोरे,बापू देवरे आदींच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button