Ahamdanagar

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंचदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंचदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन

सुनिल नजन/अहमदनगर

नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे ह.भ.प.निव्रुत्ती महाराज मतकर (आळंदीकर)आणि ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाचे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २२ ते २६ आँगष्ट २०२३याकाळात पंचदिनी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व ह.भ.प.बाबासाहेब महाराज बडे, अशोक महाराज इलग,भगवान महाराज मचे, अशोक महाराज कोंगे, यांची किर्तने होणार आहेत. शनिवार दि.२६आँगष्ट २३रोजी सकाळी९ते११ या वेळेत आळंदी निवाशी ह.भ.प.निव्रुत्ती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि रामहरी मतकर आणि नवनाथ मतकर यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या पंचदिनी किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.तसेच संदिप मतकर, भाउसाहेब मतकर, देविदास मतकर, रामदास मतकर, संतोष मतकर,विक्रम मतकर, रोहिदास मतकर, नारायण मतकर यांच्या वतीने दररोज सकाळ,संध्याकाळ अन्नदान होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मतकर /पाचे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button