Maharashtra

खासदार युवराज संभाजीराजे त्यांच्याकडून 1 कोटी 50 लाखाची मदत –

कोल्हापूर प्रतिनिधी –

तुकाराम पाटील – संपूर्ण जगावर पसरलेले कोरोना चे संकट आता कोल्हापूर पर्यंत आले आहे. म्हणून कोरोना रुग्णांना मुंबई , पुणे च्या धर्तीवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करता यावा यासाठी राज्य सभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फंडातून एक कोटी 50 लाखाचा निधी दिला आहे. कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय व महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना त्या रुग्णांना उपचारासाठी लागणाऱ्या साधन सामग्री करिता हा निधी वापरला जाणार आहे. आपल्या देशावर आलेले हे महाभयंकर संकट आहे, या संकटाला तोंड देण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री फार मोठी आहे परंतु आपण खारीचा वाटा यामध्ये उचलला आहे समाजातील प्रत्येकानी आपलाही खारीचा वाटा उचलून या संकटाला आपण परतावून लावूया, त्याचबरोबर महापालिकेला कोरोना च्या उपचारासाठी आणखी निधी देऊ. जनतेने घराबाहेर पडू नये माझा रक्षक याप्रमाणे आपली काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचना पालन करून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button