Faijpur

फैजपूर येथील सुभाष चौक ते बसस्थानकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा नगरपालिकेने नामोल्लेख करावा पप्पू मेढे यांची मागणी

फैजपूर येथील सुभाष चौक ते बसस्थानकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा नगरपालिकेने नामोल्लेख करावा पप्पू मेढे यांची मागणी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपुर शहरातील गुणवान शीलवान व सर्वगुण संपन्न असणाऱ्या पत्रकार बंधूंना व नगरपालिका प्रशासनास सांगु इच्छितो की फैजपुर नगरपालिकेने सन २०१२ मध्ये सर्व साधारण सभे मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा मा.सौ. अमिता हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन मुख्याधिकारी मा.श्री.अनिल मधुकर वायकोळे यांच्या उपस्थितीत, अंकलेश्वर – बुऱ्हाणपूर रोड वरील फैजपुर शहरातील सुभाष चौक ते बसस्थानक मार्गाला, स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न. परम पुज्य, बोधिसत्व, भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला होता, तसेच नागरपालिके तर्फे त्या मार्गाच्या नामांतराचा फलक पूर्वीचे छत्री चौक व आताचे स्व बापु वाणी चौकात लावण्यात आलेला आहे तरी सुद्धा प्रत्येक वेळी त्या मार्गाला सुभाष चौक ते बसस्थानक असे वारंवार संभोधले जाते त्या मार्गाचे नामांतर करून सुद्धा फैजपुर शहरातील पत्रकार बंधु व पालिका प्रशासन पेपरमध्ये बातमी देतांना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामोल्लेख नकरता, सुभाष चौक ते बसस्थानक असा नामोल्लेख करतांना दिसत आहे, तरी अशा वारंवार होत असलेल्या नामोल्लेखनाने, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असुन या पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, यापुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असाच उल्लेख केला गेला पाहिजे, अन्यथा भिमपुत्र ग्रुप व भिम अनुयायी फैजपुर शहारा तर्फे जनआंदोलन छेडले जाईल व डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा नामोल्लेख न करणाऱ्यान वर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल कृपया याची नोंद सर्वांनी घ्यावी…!
आयु. पप्पु मेढे, अध्यक्ष. भिमपुत्र ग्रुप फैजपुर शहर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button