Nashik

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गाव मागेल त्या कामासाठी 25 व 50 लाखाचा विकास निधी ना.- नरहरी झिरवाळ

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गाव मागेल त्या कामासाठी 25 व 50 लाखाचा विकास निधी ना.- नरहरी झिरवाळ

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील एकूण चालू काळात 60
ग्रामपंचायतीचे निवडणूक येत्या 15 जानेवारीला होत असून या ग्रामपंचायतीचे निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येत बिनविरोध केल्यास एक महिन्याच्या आत गावाचा विकासासाठी आमदार निधीतून पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला 25 लाख रुपये व 5 हजाराच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांना 50 लाख रुपयांचा विकास निधी गाव मागेल त्या कामासाठी देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिली.
त्यांनी तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावांत एकोपा असावा.व गावांचाही विकास करून घेण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्ष भेद विसरून, गट तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल.दिंडोरी तालुक्यात येत्या १५ जानेवारीला एकूण ६० ग्रामपंचायत ची निवडणूक होत आहे. ४ जानेवारीला माघारी असून तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायत च्या निवडणुका आहेत त्या ग्रामपंचयात च्या ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात.आणि ज्या ग्रामपंचयात च्या सर्व जागा बिनविरोध होतील त्या गावाला एक महिन्याच्या आत 25 लाख व ५ हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावाला 50 लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल. असे नामदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button