Akola

पांडुरंग डॉक्टरांच्या रुपात सेवा करतायेत – मा. आमदार वैभव पिचड

पांडुरंग डॉक्टरांच्या रुपात सेवा करतायेत – मा. आमदार वैभव पिचड

अकोले प्रतिनिधी – विठ्ठल खाडे

अहमदनगर/ अकोले : खऱ्या अर्थाने आपले प्रियजन सुखात रहावेत म्हणून डॉक्टरांना सर्वस्व मानून आपण वेळप्रसंगी सेविंग्स मोडून, एफ डी तोडून, दागिने विकून, जमीन विकून उपचार घेत असतो, यावेळी आपण अपेक्षा ठेवतो योग्य उपचाराची, बहुतांशी आरोग्य कर्मचारी सेवा समजून कार्य करतात व पेशंटला वाचविण्यासाठी जीवाचं रान करतात.
म्हणूनच या कोरोनाच्या काळात माझा अकोले तालुका सुरक्षित रहावा म्हणून अकोले तालुका डाँक्टर असोशिएशन च्या सदस्यांसोबत चर्चा करण्यात आली
याठिकाणी कुणाही नागरिकाची जर आरोग्यविषयक फसवणूक होत असेल तर माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा आपल्याला न्याय देण्याचे काम केले जाईल
अकोले तालुक्यातील डॉक्टर्स नक्कीच चांगलं काम करताय याठिकाणी त्यांनी त्यांची जबाबदारी अशाच पद्धतीने अतिशय प्रामाणिकपणे पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली तर यावेळेस मा. आ. वैभवराव पिचड साहेब व डाँक्टर बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button