Aurangabad

पैठणी महावस्त्राला जगात मानाचे स्थान मिळवून देणार – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

पैठणी महावस्त्राला जगात मानाचे स्थान मिळवून देणार – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : पैठणी महावस्त्राला संपूर्ण भारत देशात मानाचे स्थान आहे. त्याप्रमाणे संपूर्ण जगात पैठणीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कारागीर महिलांना लागेल ती मदत करायला शिवसेना पुढाकार घेईल, असा विश्वास शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाताई ठाकरे लघुउद्योजक महिलांसाठी पैठणी प्रशिक्षण व स्वयंरोजगार कार्यशाळेचे तापडिया नाट्य मंदिर येथे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, पैठणी प्रशिक्षण व स्वयंरोजगार कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांना पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती व्हावी, हा प्रमुख उद्देश आहे. तसेच महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी जिल्हा परिषद आणि महापालिकेकडून गाळा उपलब्ध करून देण्यात येईल. पैठणी महावस्त्राला संपूर्ण जगात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असेही माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button