Karnatak

हुलसूर येथील शेतकरी महिलांना हैद्राबाद येथे एकदिवसीय प्रक्षिशन

हुलसूर येथील शेतकरी महिलांना हैद्राबाद येथे एकदिवसीय प्रक्षिशन

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर येथील शेतकरी महिलांना हैद्राबाद येथे हैद्राबाद भारतीय श्रीधान्य संषोधन संस्थेच्या वतीने एक दिवशीय श्रीधान्य बद्दल प्रक्षिशन देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन करून हैद्राबाद भारतीय श्रीधान्य संषोधन संस्थेचे निर्देशक डॉ विलास टोणपी यांनी शेतकरी महिलांना हे श्रीधान्य कशा पद्धतीने पेरणी करावी व याचे कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यासाठी पदार्थ तयार करावे याच्या सेवनाने चांगले आरोग्य राहते श्रीधान्य हे कमीतकमी खर्चात चांगले धान्य येते त्या धान्याचे पैसे ही जास्त येतात पहिले आपले पुर्वज फक्त श्रीधान्य जास्त प्रमाणात शेतात पीक घेत व तेच अन्न खात त्यामुळे त्यांना कोणतेहि आजार येत नसत या श्रीधान्य मध्ये ईतके ताकद आहे त्यामुळे शेतकरी महिला या श्रीधान्याचे जास्तीत जास्त पीक घेतले पाहिजे सरकार व हैद्राबाद भारतीय श्रीधान्य संस्थेच्या वतीने जे सवलती दिल्या जातात ते सर्व मिळतील असे बोलत होते.
यावेळी उपस्थित क्रषी अधिकारी डॉ संगाप्पा चिलरगे, डॉ अमशिद्ध, डॉ लक्ष्मी चिलरगे प्रमुख महेश ईजारे, गिरीश मेहकरे, रवींद्र तोगरखेडे, रुपा चिलरगे, अंबिका मेहकरे, शोभावती, गौरम्मा एकलुरे आदी होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button