Jalana

राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रामाणिकपणे चांगले काम करणारे गाडेकर साहेबांचे प्रहार सैनिकांच्या वतीने सत्कार

राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रामाणिकपणे चांगले काम करणारे गाडेकर साहेबांचे प्रहार सैनिकांच्या वतीने सत्कार

संजय कोल्हे जालना

जालना : राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू भाऊ यांच्या कडू वाढदिवसानिमित्त भाऊंच्या आदेशावरून जो अधिकारी प्रामाणिकपणे चांगला काम करतोय, गोरगरीब, कष्टकरी,शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवताय अशा अधिकारी चे स्वागत, सत्कार करण्यात यावे, म्हणून जालना येथील प्रहार सैनिकांकडून अंबड तालुका तहसील कार्यालय मध्ये कार्यरत असलेले मा. श्री.शिवाजी गाडेकर साहेबांचे प्रहार जिल्हाध्यक्ष विदूर भाऊ लाघडे व राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचे मराठवाडा स्विय सहाय्यक मा. संतोष राजगुरू सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. गाडेकर साहेब हे अंबड तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहे, आणि तहसील कार्यालयात कोणतेही काम असो ते प्रामाणिकपणे पुर्ण करतात. गोरगरीब लोकांना शासकीय कामात सदैव सहकार्य व मार्गदर्शक करत असतात. गाडेकर साहेब म्हणजे गोरगरीब लोकांसाठी चालते फिरते मंत्रालय च आहे.या सत्कार प्रसंगी नारायण टकले पाटील (जिल्हाउपाध्यक्ष शिवसंग्राम संघटना जालना), संदीप धुळे सर (प्रहार जिल्हा सचिव जालना), बाळासाहेब काळवणे (प्रहार युवा जिल्हाध्यक्ष जालना), जुबेर पटेल (प्रहार प्रसिद्धी प्रमुख जालना), राजेंद्र गायकवाड (प्रहार तालुकाध्यक्ष अंबड), सुरेश खरात (प्रहार अपंग संघटना तालुकाध्यक्ष अंबड), आकाश थेटे पाटील (प्रहार युवा तालुकाध्यक्ष अंबड), माऊली हुसे (प्रहार सर्कल प्रमुख रोहिलागड), गिरीधर राजपुत सर, तलाठी देशपांडे साहेब उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button