Surgana

अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस यांनी घेतली आमदार जे पी गावित यांची भेट

अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस यांनी घेतली आमदार जे पी गावित यांची भेट

सुरगाणा विजय कानडे

आज दि.22/1/2020 रोजी सुरगाणा येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस यांनी त्यांच्या अडचणी घेऊन मा.आमदार. काँ. जे.पी.गावीत साहेब व काँ. इंद्रजित गावीत उपसभापती पं.स.सुरगाणा यांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांना येणाऱ्या सर्व अडचणी, सविस्तर सांगितल्या व त्यावर मा.आमदार साहेबांनी संबधीत अधिकारी वर्गाला लगेचच प्रत्यक्ष बोलावून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
त्यात पहिला प्रश्न लगेचच सुटला तो म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यापासून T.A.D.A दिला नाही तो तात्काळ आजच खात्यावर वर्ग केला. आणि राहिलेले प्रश्न पाच दिवसाच्या आत सोडवतो असे I.C.D.S सुरगाणा च्या अधिकारी यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस यांनी घेतली आमदार जे पी गावित यांची भेट

?अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/मदतनीस यांचे ज्वलंत प्रश्न ?
1.आँक्टोंबर 2019 पासुन आज पर्यंत पगार नाही.
2.मोबाईल रिचार्ज साठी पैसे दिले जात नाही.
3.इंधन बिल चार महिन्यापासून दिले नाही.
4.पोषण आहाराचे बिल वेळेवर मिळत नाही.
5.अंडी/केळी यांचे बिल वेळेवर मिळत नाही.
6.T.A.D.A चे बिल.तबल्ल 2012 पासुन मिळाले नाही.
7.भाऊबीज चे पैसे तीन वर्षा पासून माळाले नाही.
8.दर महिन्याला तालुक्याच्या ठिकाणी 10ते 12 वेळेस मिटिंग लावल्या जातात ते बंद झाले पाहिजे.

अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस यांनी घेतली आमदार जे पी गावित यांची भेटअसे अनेक प्रश्न आज अंगणवाडी सेविकांनी उपस्थित करून त्यांचे मन मोकळे केले.
या वेळी मा.आमदार साहेबांनी सांगितले की, जर पाच दिवसात सबंधित प्रश्न सुटले नाही तर जिल्हा परिषद नाशिक येथे मोठा मोर्चा काढण्यात येईल. या वेळी उपस्थित इंद्रजित गावीत पं.स.उपसभापती , वसंत बागुल,सावळीराम पवार, सुरेश गवळी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button