Yawal

यावल भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या २० फेब्रुवारी या दर्पणकार जांभेकरांच्या जयंती निमित्ताने डॉ . कुंदन फेगडेच्या हस्ते प्रतिमा अनावरण

यावल भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या २० फेब्रुवारी या दर्पणकार जांभेकरांच्या जयंती निमित्ताने डॉ . कुंदन फेगडेच्या हस्ते प्रतिमा अनावरण

यावल प्रतिनिधी अमित एस तडवी

येथील युवा सामाजीक कार्यकर्ते तथा आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ . कुंदन सुधाकर फेगडे यांच्या हस्ते नव्या राज्य शासनाव्दारे आदेशीत केलेल्या २० फेब्रुवारी हा दिवस मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंतीच्या पार्श्वभुमीचे औचित्य साधुन भारतीय बहुउद्देशिय पत्रकार संघ, महाराष्ट्र व्दारे आयोजीत दर्पणकार जांभेकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले . यावल येथे आज भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ,महाराष्ट्रच्या वतीने मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या दिनांक २० फेब्रुवारी हे दर्पणकार जांभेकरांच्या जयंतीचे औचित्य साधुन युवा सामाजीक कार्यकर्त डॉ . कुंदन फेगडे यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयात बाळशास्त्री जांमेकरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात येवुन त्यांना प्रतिमा भेट करण्यात आली . यावेळी डॉ .कुंदन फेगडे यांनी पत्रकार संघाला प्रत्येक शासकीय कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांमेकरांची प्रतिमा भेट म्हणुन २१ प्रतिमा भेट दिल्यात , या प्रसंगी भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल , प्रदेश सचिव जिवन चौधरी , प्रदेश संघटक सुनिल गावडे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष प्रकाश चौधरी ,
जिल्हा सचिव शब्बीर खान, तालुका अध्यक्ष ए टी चौधरी , तालुका उपाध्यक्ष फिरोज तडवी , संघटक विक्की वानखेडे , जिल्हा प्रतिनिधी राजेन्द्र आढाळे, दिपक नेवे आदी पत्रकार उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button