Indapur

इंदापूर पोलिस ॲक्शन मोडवर…दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून वयोवृद्ध महिलेला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीस गुन्हा घडल्यापासुन 5 तासात अटक

इंदापूर पोलिस ॲक्शन मोडवर…दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून वयोवृद्ध महिलेला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीस गुन्हा घडल्यापासुन 5 तासात अटक

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर शहरात काल दिनांक
27/7/2023 रोजी सकाळी 10 वाजता रूक्मिणी पांडुरंग करगळ वय 80 या औषध खरेदीसाठी आल्या होत्या.परंतु वेळेवर एसटी नसल्यामुळे चालत पुन्हा घरी जात असताना जुना पुणे सोलापूर रोड वर एक अनोळखी मोटरसायकल स्वराने सदर वयोवृद्ध महिलेस घरी सोडतो असा बहाना करून मोटरसायकल स्वाराने सरडेवाडी टोलनाकेच्या दिशेला नेऊन लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. गालास, हातास, पायास गंभीर दुखापत करून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, रोख रक्कम, एसटीचा पास असा मुद्देमाल लुटुन नेला होता. सदर बाबत इंदापूर गुन्हा रजिस्टर 751 23 भा.द.वी . कलम 394 दाखल करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून उपविभागी पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शोध पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिले होत्या. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीवरून दिलीप लक्ष्मण अंकुश वय 50 राहणार सणसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यास घडल्यापासून पाच तासाच्या आत मध्ये गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडे चोरी केलेले दागिने मोटरसायकल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, योगेश लंगोटे , सा फौजदार प्रकाश माने पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, गणेश ढेरे ,मोहन आंनदगावकर होमगार्ड संग्राम माने, लखन झगडे यांनी केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button