Indapur

इंदापुर तालुक्यातील पळसदेव च्या तलाठ्यावर लाच घेताना पुण्यात कारवाई.

इंदापुर तालुक्यातील पळसदेव च्या तलाठ्यावर लाच घेताना पुण्यात कारवाई.

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावचे तलाठी राजेश उत्तम गायकवाड व त्यांचा साथीदार संग्राम नथू भगत या दोघांच्या विरोधात लाच लुचपत विभागाने कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या दोघांना आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

सविस्तर माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील तलाठी राजेश गायकवाड यांनी साथीदाराच्या मदतीने आठ हजार रुपयांची लाच एका पुण्यात स्थायिक असलेल्या परंतु पळसदेव येथील शेती असलेल्या व्यक्तीला मागितली होती.

गायकवाड यांनी लाच घेण्यासाठी एका खासगी व्यक्तीची निवड केली होती .त्या खाजगी व्यक्तीवर पाळत ठेवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी व लाच स्वीकारणारा व्यक्ती यांच्या वर तक्रारीनुसार सापळा रचून पद्धतशीरपणे रंगेहात पकडले व त्यांच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button