Ahamdanagar

स्व.चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंतांना राजळे महाविद्यालयात पुरस्कार प्रदान !

स्व.चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीने गुणवंतांना राजळे महाविद्यालयात पुरस्कार प्रदान !

सुनिल नजन/अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्याचे सहकार महर्षी(।। निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू,अखंड स्थीतीचा निर्धारू श्रीमंत योगी हा ।।)या उक्तीप्रमाणे स्व.दादापाटील राजळे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे स्व.चंद्रभागाबाई दादापाटील राजळे सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील पन्नास पेक्षा जास्त गुणवंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने प्रगतशिल शेतकरी, गुणवंत विद्यार्थी आणि उच्च पदवीधारक शिक्षक यांचा समावेश होता.दहावी, अकरावी, बारावी, चे विद्यार्थी, पिएचडी झालेल्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.तानाजी पाटील व श्रीगोंदा महाविद्यालयाचे प्राचार्य एकनाथ खांदवे सह ह.भ.प. अशोक महाराज कर्डीले यांच्या हस्ते हे राज्य स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले.या पुरस्कारार्थी मध्ये (दहावी)च्या परिक्षेत प्रथम आलेल्या जवखेडे च्या कानिफनाथ माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी पल्लवी राजेंद्र मतकर,छत्रपती शिवाजी विद्यालय,का.पिंपळगाव पुजा घुले,ऋतूजा पाचपुते कारखाना, संध्या धस पाथर्डी, विद्या चव्हाण तिसगाव, मानसी निर्हाळी पाथर्डी, (अकरावी)-सोनल नागरगोजे, निकिता ढमाळ, अकांक्षा तुपे,गौरव तिजोरे,अम्रूता भगत,योगिता काजळे,पल्लवी कांबळे,श्रद्धा राजळे,श्रुती लवांडे,निकिता गीरी, आरती भोसले,अम्रूता पवार, (पीएचडी)-सर्व प्राध्यापक अजिंक्य भोर्डे,सुनिल क्षिरसागर, अशोक वैद्य, वैशाली आहेर,विजय जगदाळे, मनिषा सानप,मिलिंद गायकवाड, राजेंद्र घोलप,धर्मराज सुरोसे,(चार्टर्ड अकौंट) परिक्षेत तिसगावचे पत्रकार स्व.सुशिल शिंगवी यांचे सुपुत्र सत्यम सुशिल शिंगवी व दशरथ खोसे,आणि राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य राजधर टेमकर सर यांना अमेरिकेच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीची डॉक्टर आँफ डीलीट ही पदवी प्राप्त,आणि प्रगतशिल शेतकऱ्या मध्ये उस,दुध,फळे उत्पादक शेतकरी म्हणून आसाराम भगत,महादेव राजळे,अशोक माने यांच्या सह अनेक शेतकऱ्यांना प्रगतशिल शेतकरी म्हणून वरील सर्वांना संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव राजळे,सचिव आर.जे.महाजन, विश्वस्त राहुल राजळे,व्रुद्धेश्वरचे कारखान्याचे चेरमन अप्पासाहेब राजळे
यांच्या नेतृत्वाखाली हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यास,जेष्ठ नेते उद्धवराव वाघ,पोपटराव आंधळे,शामसुंदर राजळे, दत्तात्रय भगत,सोपानराव तुपे,कुशिनाथ बर्डे, भास्कर गोरे, प्रा.युवराज सुर्यवंशी,शहाराम भगत,सुभाषराव ताठे,बाबासाहेब किलबीले, नानासाहेब देशमुख, भाउपाटील राजळे, सदाशिव तुपे,विक्रम राजळे,किशोर मरकड,पुरुषोत्तम आठरे, सुभाष ज.देशमुख, रामकिसन काकडे,जालींदर पवार, अशोक ताठे,गंगाधर लवांडे,प्रा.निर्मला काकडे,साधना म्हस्के यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन राजेंद्र इंगळे यांनी तर आभार शाम गरड यांनी मानले. शेवटी पसायदान आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button