Paranda

रा.गे.शिंदे महाविद्यालयात प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम संपन्न

रा.गे.शिंदे महाविद्यालयात प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम संपन्न

सुरेश बागडे

परांडा ( सा.वा ) दि. ३०

शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सीएससी या कंपनीचे विश्वास गुडे ,आरती काळे ,मनीषा गिलबिले, संगीता कोळी, आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून एकूण ५५ संख्या उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल प्रा डॉ राहुल देशमुख ,प्रा सज्जन यादव, प्रा डॉक्टर विशाल जाधव यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएससी चे विश्वास गुडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले अध्यक्षीय समारोप करताना म्हणाल्या की देशांमध्ये डिजिटल इंडिया ही संकल्पना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सर्वत्र डिजिटलायझेशन झालेले आहे शहरी भागातील युवक युवती यांना याचे ज्ञान आहे परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी यापासून वंचित आहे त्यांना देशांमध्ये होत असलेल्या घडामोडीचे ज्ञान व्हावे त्यांच्या भवितव्यासाठी उद्योगधंद्यासाठी सविस्तर माहिती मिळावी यासाठी ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान महत्त्वाचे ठरत आहे डिजिटल साक्षरता अभियान यामुळे विद्यार्थ्यांना अधिकची ज्ञान प्राप्त होणार आहे यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी आधार कार्ड च्या द्वारे करून घेतली या कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ राहुल देशमुख यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button