Maharashtra

कॉफी विथ युथ खासदार युवा संवाद रंगला… अहमदनगरला कॉलेजिएन तरुणांची तोबा गर्दी….. खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रश्र्नोत्तरांने तरुण भारावले

कॉफी विथ युथ खासदार युवा संवाद रंगला…
अहमदनगरला कॉलेजिएन तरुणांची तोबा गर्दी…..
खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रश्र्नोत्तरांने तरुण भारावले

कॉफी विथ युथ खासदार युवा संवाद रंगला... अहमदनगरला कॉलेजिएन तरुणांची तोबा गर्दी..... खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रश्र्नोत्तरांने तरुण भारावलेप्रतिनिधी मनोज भोसले
अहमदनगर — आपण नवमतदार असून नवीन महाराष्ट्राच्या विकासाचे भागीदार आहात.यासाठी गेल्या पाच वर्षात केंद्राने व राज्याने शेती, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवकांसह सर्वांसाठी राबविलेल्या योजना अनेक विकासाचे प्रकल्प यातून राज्याचा चौफेर विकास झाला. याची आपणास कल्पना आहे. या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या शासन काळात घोटाळ्यांची मालिका जनतेने अनुभवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पारदर्शक कृतिशील सरकार आपल्या पसंतीस उतरले आहे. या पुढेही विकासाची मालिका सुरूच राहील. असा विश्वास जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी अहमदनगर येथील सारडा महाविद्यालयात शहर व जिल्हा भाजप युवा मोर्चा आयोजित कॉफी विथ युथ युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजाविणारे युवा मतदारांनी खासदार उन्मेष दादा पाटील यांचेशी दिलखुलास संवाद साधला. भारतीय जनता युवा मोर्चा अहमदनगर शहर जिल्हाच्या वतीने पेमराज सारडा महाविद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात *युवा संवाद* #coffee with youth कार्यक्रम घेण्यात आला.

याला उदंड प्रतिसाद लाभला.यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष किशोर वाकळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विनोद दळवी, भाजयुमो प्रदेश सचिव तसेच नगर शहर प्रभारी राजेंद्र साबळे, भाजयुमो प्रदेश सदस्य कुशल भापसे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन तांबे,शहर जिल्हा अध्यक्ष नितीन शेलार, मा. नगरसेवक सुवेंद्र गांधी, उमेश साठे, मिलिंद भालसिंग, बंटी डापसे, कैलास गर्जे, मनोज कोकाटे, लक्ष्मीकांत तिवारी, आज्जूभाई शेख, सुजित खरमाळे, अभिजित सोनवणे, अभिषेक शिंदे, दिपक उमाप, आकाश त्रिपाठी, गणेश लाटे, मनोज आडोळे, अभिजित चिप्पा, अमोल ताठे तसेच जिल्ह्यातील सर्व भाजयुमो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष उमेश साठे यांनी मांडले, सूत्रसंचालन उद्धव काळापाहाड यांनी केले.

यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार उन्मेष दादा पाटील यांनी तरुणांशी मनमोकळा संवादाने तरुण भारावले होते. अनेकांनी खासदार पाटील यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button