Dhule

केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रोश यात्रा

केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रोश यात्रा

असद खाटीक

भाजपच्या केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी धोरणा विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथून आक्रोश यात्रा काढण्यात आली
यावेळी या आक्रोश यात्रेमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झाले होते

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी विषयक धोरण आणले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा आरोप करीत बाजार समित्या बंद करून ग्रामीण भागाशी शेतकऱ्यांची असलेली नाळ तोडण्याचा व उद्योगपतींच्या हातामध्ये शेतकऱ्यांची दोरी देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार तर्फे केला जात आहे असा देखील आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लावण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयक धोरणा विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तर्फे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे शिंदखेडा तहसील अधिकाऱ्यांना या आशयाचे निवेदन देऊन केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला आहे.. असद धुळे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button