Faijpur

नाशिक ला भालोद चौधरी परिवाराचे स्नेह मेळावा ‘वसुंधरा कुटूंबकम’प्रमाणे परिवारातील स्नेह वृद्धिंगत व्हावा – खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी

नाशिक ला भालोद चौधरी परिवाराचे स्नेह मेळावा
‘वसुंधरा कुटूंबकम’प्रमाणे परिवारातील स्नेह वृद्धिंगत व्हावा – खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : सद्यस्थितीत आपण बघतोय भारतीय संस्कृतीचा ऱ्हास होत एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे.कुटुंबे लहान होत चाललीय. त्यामुळेच देशात आज रोजी वृद्धाश्रम – अनाथालय फोफावत आहे,त्यातच नोकरी,व्यवसाय निमित्त आपली गावे सोडून बाहेर अर्थात शहराकडे माणस जात आहेत.ग्रामीण भागातील खेडे- घरे ओस पडताना दिसत आहे.यावर एकच उपाय तो म्हणजे जगतगुरु श्रीकृष्णांचे ‘वसुंधरा कुटूंबकम’ प्रमाणेच परिवार,नाती गोती यांच्या मधे सदभावना – स्नेह हा अधिका – अधिक वृद्धिंगत होणे ही काळाची नितांत गरज झाली आहे असे प्रतिपादन चौधरी कुटूंबाचे सदस्य तथा खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांनी केले आहे
यासाठी प्रत्येक परिवारात सुसंवाद घडावा.त्यासाठी सर्वांनी अधून मधून प्रत्यक्ष एकत्र येऊन संवाद करावा व आपुलकी ची नाळ जुळून राहावी यासाठी स्नेह संमेलनचे निमित्त हे हवेच.असेच एक स्नेह संमेलन मेळावा नाशिक त्र्यंबकेश्वर येथील वैतरणा धरण येथे रंगले.ते म्हणजे भालोद जिल्हा जळगांव येथील चौधरी परिवाराचे.आणि यासाठी खास पुढाकार घेतला तो याच परिवारातील संत बनलेल्या गुरुकुल चे उपाध्यक्ष तथा खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी तर . व्यवस्थापन प्रवीण चौधरी व कमलाकर चौधरी यांनी केले
यासाठी खास निमित्त साधले गेले ते चौधरी परिवारातील अ.नि.श्री.डिगंबर झिपरू चौधरी व अ.नि. तुळसाबाई डिगंबर चौधरी.यांचे पुण्य स्मरण.या स्नेह मिलन सोहळ्यात बोलताना शास्त्री भक्ती किशोर दासजी म्हणाले परिवार कोणताही असो.त्यात कायम संवाद,एकता,स्नेह, आनंद असेल तर तो परिवार उच्च कोटीला जावून आपला सर्वांगीण विकास करीत समाज व राष्ट्र प्रबोधनाचे पुण्यफल प्राप्ती करू शकतो.

आजच्या अत्याधुनिक मोबाईल व धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस पैसा व प्रतिष्ठेच्या
आहारी जात असल्यानं आपले कुटुंब, आपली नाती व आपले स्नेही या सर्वांचा त्याला
विसर पडू लागला आहे.पारिवारीक सदस्यांमध्ये संभाषणं कमी होत असल्याने नात्यात
दुरावा निर्माण होऊ लागला.नात्यातील प्रेमाचा ओलावा कुठे तरी कमी होताना दिसत आहे.दुःखाच्या प्रसंगी एकटे पडल्याची भावना निर्माण होत आहे.केवळ मोबाईल मध्येच सुख – शांती शोधण्याचे व्यर्थप्रयास होऊ लागले आहेत.पण या स्नेह संमेलन मुळे नक्कीच स्नेह,एकतेचा व आनंदाचा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.एखाद्या गरीब कुटुंबात जर आजार, उपचार, किंवा शिक्षणासाठी गरज भासली तर ती करण्यासाठीही पुढाकार घेण्याचे ठरले.आपल्या माणसांना जगविणे,घडविणे यासारखे दुसरे पुण्य कोणतेच नाही.असे शास्त्री यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मनोगत,लहान मुले व मुलींचे भाषण व ग्रीत/कविता सादरीकरण.श्री आरती,मुला मुलींचे विविध खेळ व नृत्य,महिलांचा गरबा. स्नेह भोजन,सामूहिक गप्पा टप्पा झाल्यात.नोकरी व्यवसायानिमित्त दूर दूर गेलेले व फारसे एकत्र न येऊ शकणारे परिवारातील सदस्य हे एकत्र आल्याने सर्व आनंदी झाले. एकमेकांना भेटता आले. सूत्रसंचालन
सलोनी चौधरी व मानसी चौधरी यांनी केल

नाशिक ला भालोद चौधरी परिवाराचे स्नेह मेळावा 'वसुंधरा कुटूंबकम'प्रमाणे परिवारातील स्नेह वृद्धिंगत व्हावा - खान्देशरत्न शास्त्री भक्तीकिशोरदासजी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button