Ahamdanagar

ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी घेतली रस्त्याचे निक्रुष्ठ काम करणाऱ्या ठेकेदार, अभियंता यांची झाडाझडती?

ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी घेतली रस्त्याचे निक्रुष्ठ काम करणाऱ्या ठेकेदार, अभियंता यांची झाडाझडती?

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री सडक योजनेतुन शिरापूर ते पानतासवाडी हा ४०लाख रुपये आणि तिसगाव ते सोमठाणे हा ३३लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन ना.तनपुरे यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. मागील लोकप्रतिनिधी सारखे माझे काहीच सोपस्कार पार पाडायचे नाहीत हारबुके दिले त्यावरच मी खुष आहे. पण रस्त्याच्या कामात जर गुणवत्ता दिसली नाही तर कोणत्याही ठेकेदार, अभियंता यांची गय केली जाणार नाही असा सज्जड ईशारा ना.तनपुरे यांनी दिला. हे ऐकताच शेवगावचे संबंधीत ठेकेदार हे आपले मोबाईल बंद करून निघून गेले. सोमठाणे येथे नामदारांनी ठेकेदार यांना बोलावले असता ठेकेदार गायब झालेले दिसून आले. कारण कासारपिंपळगाव ते जवखेडे या रस्त्याचे ३ लाख रुपये खर्चाचे काम याच ठेकेदारांनी केले होते सहा महिन्यात रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. आ.मोनिकाताई राजळे यांच्या आमदार निधीतून हे काम करण्यात आले होते.शिरापूर येथे रस्त्याच्या कामाच्या भुमिपुजना नंतर आदिवासी समाजाला खावटी अनुदाना अंतर्गत धांन्याचे वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे,रोहिदास कर्डीले,राजेंद्र म्हस्के, बबनराव बुधवंत,नितीन लोमटे,संजय लवांडे, उप अभियंता संजय गायकवाड, महेंद्र मुंगसे,विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके,संभाजी पालवे,शिदोरे सर,पांडुरंग शिदोरे, सुनिल लवांडे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक नेते उपस्थित होते. पारेवाडी येथे सरपंच सौ.तनपुरे यांच्या घरी ना.साहेबांनी भेट दिली.प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button