Aurangabad

खासदार आमदार यांच्या गाड्या फिरु देणार नाही…

खासदार आमदार यांच्या गाड्या फिरु देणार नाही…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : सकल मराठा समाजाच्या भावनेशी खेळत न्यायालयाने देखील मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत स्थगिती दिली आहे. त्यामुळे सकल मराठा समाजातील तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संतापाच्या लाटेचा उद्रेक झाला तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार यांच्या गाड्या आम्ही फिरु देणार नाही. असे निवेदन वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांना वैजापूर तालुक्यातील तहसील कार्यालयात जाऊन देण्यात आले आहे.

शासनाने वेळोवेळी काही तरी कारण सांगून मराठा समाजाची तसेच मराठा समाजातील युवकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई लढतांना देखील मराठा समाजाची भुमिका अद्यापही सरकारने स्पष्ट केलेली नाही. तसेच मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा सकल मराठा समाज वैजापूर यांच्या कडून देण्यात आला आहे.

जर मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र आला तर महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या गाड्या आम्ही रस्त्यावर फिरु देणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मा. उप विभागीय अधिकारी, कार्यालय वैजापूर. मा. तहसीलदार, तहसील कार्यालय वैजापूर. मा. आमदार रमेश पाटील बोरनारे सर, कार्यालय वैजापूर यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर अजय मोटे, अजय साळुंके, किशोर मगर, चंद्रशेखर साळुंके, संतोष वडगुले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button