Nagpur

खासदार नवनीत राणा यांनी न्यायालयात दाखल केलेला हरकत अर्ज फेटाळला

खासदार नवनीत राणा यांनी न्यायालयात दाखल केलेला हरकत अर्ज फेटाळला

नागपूर : खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांना समंस बजावले आहेत. निवडणुकी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिका रद्द करण्यात यावी यासाठी नवनीत राणा यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली व त्यांच्या विरोधात याचिका दाखल करणारे माजी खासदार आनंदराव अडसुळ व सुनील भालेराव यांची याचिका ग्राह्य धरून नवनीत राणा यांना समंस बजावले आहे.

27 ऑक्टोबर रोजी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये खासदार नवनीत राणा विरुद्ध दाखल दोन निवडणूक याचिकांमध्ये झालेल्या सुनावणीत सदरील निवडणूक याचिका फेटाळ न्यासाठी खासदार नवनीत राणा द्वारे दाखल हरकत अर्जावर सुनावणी होऊन त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आवाहन देताना प्रमुख मुद्दा असा आहे की खोटे शपथपत्र दाखल करून निवडणूक लढविली आहे. या याचिकेमुळे दोन्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने माननीय उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले असता नवनीत राणा यांनी वरील दोन्ही निवडणूक याचिका फेटाळण्यासाठी वेगवेगळे अर्ज माननीय उच्च न्यायालयासमोर सादर केले होते. त्यामध्ये राणा यांनी असे म्हटले की त्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणांद्वारे व जात वैधता प्रमाणपत्र समितीद्वारे वैध ठरवू दिले आहे. अशा परिस्थितीमुळे सदरील दोन्ही निवडणूक विरोधी याचिकाची सुनावणी घेण्यास अर्थ नसल्यामुळे या पुढील कारवाई रोजी खासदार नवनीत राणा यांच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती झेड. ए.हक यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणीनंतर राणा यांचे दोन्ही अर्ज माननीय न्यायमूर्तींनी फेटाळले. खासदार नवनीत राणा यांना त्या अनुसूचित जातीच्या असल्याचे न्यायालयातच सिद्ध करावे लागेल. व निर्णायक पुरावा द्यावा लागेल. वरील दोन्ही निवडणूक याचिकांमध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांचे तर्फे ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट. प्रमोद पाटील व त्यांचे सहकारी ऍड. सचिन थोरात मुंबई आणि ऍड. राघव कविमंडन यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. विरुद्ध पक्षाच्यावतीने ऍड. जीया काझी नागपूर यांनी आपले म्हणणे मांडले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button