Ratnagiri

जे.एस.राठोड यांच्यावर कारवाईसाठी आमदार धूर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र आदिवासी विकास विभागात 52 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार

जे.एस.राठोड यांच्यावर कारवाईसाठी आमदार धूर्वे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र आदिवासी विकास विभागात 52 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार

रत्नागिरी : श्री.जे.एस.राठोड ( महाव्यवस्थापक ,विपणन ) यांचेवर कारवाई करुन , ५२ कोटी रु.वसूल करण्यात यावेत, अशी आर्णी विधानसभेचे आमदार संदीप धुर्वे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात म्हटले आहे की,
आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत खरेदी हंगाम सन २००९ ते २०१० ,सन २०१० ते २०११ व सन २०११ ते २०१२ या तीन वर्षात शासन निर्देशाचे कोणत्याही प्रकारचे पालन न करता श्री.जे.एस.राठोड यांनी आपल्या मर्जीने राईस मिलर्सना बिना बँक गँरंटीने धान दिला.दिलेल्या धानाचा तांदूळ आजपर्यंत राईस मिलर्सनी जमाच केलेला नाही.शिवाय तांदूळ जमा करुन घेतला पाहिजे याबाबत त्यांनी साधे प्रयत्नही केलेले नाहीत. परिणामत: शासनाचे व तद्अनुषंगाने आदिवासी समाजाचे तब्बल ५२ कोटीं रुपयांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीस श्री.राठोड हेच जबाबदार आहेत.
यासंदर्भात चौकशी करण्यासाठी शासनाने लोकलेखा समितीची नियुक्ती केलेली होती.या समितीने आपला अहवाल सुद्धा शासनास सादर केलेला आहे.
पण या अहवालानुसार श्री.जे.एस.राठोड यांचेवर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. उलट आदिवासी विकास महामंडळाने त्यांना ‘ महाव्यवस्थापक ‘ विपणन ह्या पदावर विराजमान केले. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
शासनाचे व पर्यायाने आदिवासी समाजाचे ५२ कोटींचे नुकसान करणाऱ्या श्री .जे.एस.राठोड यांचेवर कठोर कारवाई करुन नुकसान झालेल्या ५२ कोटी रुपयांची भरपाई त्यांचेकडून वसूल करण्यात यावी. अशी मागणी आमदार संदीप धुर्वे यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button