Yawal

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी महेश पाटील यांची निवड

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी महेश पाटील यांची निवड

यावल ( शब्बीर खान ) तालुक्यातील उंटावद येथील पत्रकार महेश पाटील यांची भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, किनगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या उप कार्यालयात संपन्न झालेल्या भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल हे होते . यावेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चौधरी , उपाध्यक्ष सचिन नायदे , सचिव शब्बीर खान , जिल्हा सहकार्यवाहक नितिन बडगुजर, विभागीय संघटक मनोज नेवे , सदस्य सुनिल पिंजारी , विक्की वानखेडे , दिपक नेवे, अरूण अजमेरा आदी पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते . यावेळी पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली , या चर्चेत अय्युब पटेल , महेश भागवत पाटील , प्रकाश चौधरी यांनी सहभाग घेत पत्रकारांना मार्गदर्शन केलीत . यावेळी महेश पाटील यांच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे निवडपत्र संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या हस्ते देण्यात आले .या प्रसंगी महेश भागवत पाटील यांच्या निवडीचे उपस्थित पत्रकारांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button