Bollywood

Bollywood: 11 वर्षीय आराध्या बच्चनने ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा..! न्यायालयाने दिला हा निर्णय..!

Bollywood: 11 वर्षीय आराध्या बच्चनने ठोठावला उच्च न्यायालयाचा दरवाजा..! न्यायालयाने दिला हा निर्णय..!

अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंबीय हे कायमच चर्चेत असतात. आराध्या बच्चन ही ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची मुलगी आहे तर अमिताभ बच्चन यांची ती नात आहे. तिच्या विषयी एक फेक न्यूज व्हायरल झाली होती. त्यामुळे आता बच्चन कुटुंबाने ही फेक न्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनलच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. आराध्या बच्चनचं आयुष्य आणि तिच्या आरोग्याविषयी ही फेक न्यूज चालवण्यात आली होती.

बच्चन कुटुंबाने ठोठावला कोर्टाचा दरवाजा
आराध्याबाबत आलेल्या फेक न्यूजमुळे युट्यूब चॅनलविरोधात बच्चन कुटुंब कोर्टात गेलं आहे. आपल्या अर्जात बच्चन कुटुंबाने हे म्हटलं आहे की ज्या युट्यूब चॅनलने आराध्याबाबत बातमी दिली आहे त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी. तसंच ही व्हायरल होणारी बातमी थांबवली जावी. कारण आराध्या ही अल्पवयीन आहे. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर २० एप्रिलला या प्रकरणावरीच याचिकेची सुनावणी झाली आहे. यासंदर्भात बच्चन कुटुंबाने कुठलेही अधिकृत पत्रक काढलेले नाही.

20 एप्रिल आज दिला कोर्टाने हा निर्णय

कोर्ट म्हणाले – यूट्यूबकडे या प्रकरणांमध्ये कोणतेही धोरण का नाही?
यूट्यूब व्हिडीओवर आक्षेप व्यक्त करताना न्यायमूर्ती सी हरी शंकर म्हणाले की, प्रत्येक मुलाचा आदर करण्याचा अधिकार आहे. भविष्यातही अशा खोट्या बातम्या शेअर करू नका. न्यायालयाने गुगल आणि सर्व यूट्यूब प्लॅटफॉर्मला याचिकेत पक्षकार म्हणून समन्स बजावले आहेत.

न्यायालयाने यूट्यूबच्या वकिलाला सांगितले की, या प्रकरणांमध्ये तुमच्याकडे कोणतेही धोरण का नाही. जेव्हा तुम्हाला सांगितले जाते की अशी सामग्री YouTube वर प्रसारित केली जात आहे, तेव्हा या गोष्टींना सामोरे जाण्याचा काही मार्ग नसावा. तुम्ही युट्युब प्लॅटफॉर्म आहात, अशा गोष्टींसाठी तुमची काही जबाबदारी नाही का?

आराध्या बच्चन म्हणजेच अमिताभ बच्चन यांची नात मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहावी इयत्तेत शिकते आहे. आराध्या कविता म्हणतानाचा एक व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे कवी होते. तसंच अमिताभ बच्चन हे देखील उत्तमरित्या कविता सादर करतात. आराध्याची तुलना अमिताभ बच्चन यांच्या सादरीकरणाशीही केली गेली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button