Bollywood

Bollywood Stories: नाबाद 90…! सुरसम्राज्ञी आशा भोसले यांनी दोन अटींसह दादा कोंडके यांना घातली होती लग्नाची मागणी… विचारात पडलेल्या दादांनी घेतला हा निर्णय…

Bollywood Stories: नाबाद 90…! सुरसम्राज्ञी आशा भोसले यांनी दोन अटींसह दादा कोंडके यांना घातली होती लग्नाची मागणी… विचारात पडलेल्या दादांनी घेतला हा निर्णय…

गेली अनेक दशके आपल्या गोड गळ्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका आशा भोसले आज, ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मा आशाताई भोसले यांना ठोस प्रहार परिवाराकडून वाढदिवसाच्या आदिम शुभेच्छा…आजही वयाच्या ९० त्या आज दुबईत लाइव्ह शो करतायत. यातचं त्यांच्या आयुष्याचं तारुण्य दडलं आहे. आजही त्या दिसायलाही तितक्याच तरुण आणि त्यांचं गाणंही तरुण आहे. आशाताईंबद्दलची आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच हास्य. सदा बहार हास्याचा झराच जणू त्या आहेत. पण हसऱ्या चेहऱ्यामागं अनेक कहाण्या दडल्या हेही तितकंच खरं. लग्नानंतरच्या सांसारिक अडचणींपासून, मुलीच्या अकाली निधनापर्यंत संकटांचा मुकाबला त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना करावा लागला. आयुष्यात खूप काही घडून गेलं असलं तरी, त्या म्हणतात की, आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी या आपणच सोडवायच्या असतात. आशाताईंच्या आयुष्यावर एखादा बायोपिक आला तर त्यात सगळंच असेल. गाणं, प्रेम, स्पर्धा, वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात होत्याच. त्यांच गाणं जितकं डोक्यावर घेतलं, तेवढीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा झाली. आर. डी बर्मन यांच्याशी लग्नकरण्या आधी आशाताई दादा कोंडके यांच्या वर प्रेम होत. दादा कोंडके यांचं आत्मचरित्र “एकटा जीव” यात ‘आशा निराशा’ असं म्हणत या नात्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रेम कहाणीची लता दीदींना कल्पना होती. दादा सुपरस्टार होते. सलग हिट चित्रपट देत होते. दादांचं घरी जाणं येणं ही होत.आशा भोसले आणि दादा कोंडके यांचे प्रेमसंबंध होते हे सर्वश्रुत आहे.आशा भोसले यांनी या नाटकाच्या जवळपास ६५ प्रयोगाला हजेरी लावली होती. त्याकाळात आशा भोसले आणि दादा कोंडके अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसले. दादा कोंडके यांचे पहिले लग्न नलिनी सोबत झाले होते. घरच्यांच्या इच्छेखातर दादांनी नलिनीशी संसार थाटला मात्र अवघ्या चार वर्षांतच त्यांनी नलिनीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.१९६८ साली नलिनीला ४० हजारांची पोटगी देऊन त्यांनी घटस्फोट घेतला होता.आयुष्यातल्या या पडत्या काळातच दादांची आणि आशा भोसले यांची भेट घडून आली. आशा भोसले यांच्याही आयुष्यात एकाकीपणा आला होता. आशा भोसले यांना हॉटेलमध्ये जाण्याची फिरण्याची भारी हौस. नाटक रद्द करून त्या दादांना फिरायला घेऊन जात.

त्या दोन अटी..

शेवटी आशा भोसले यांनीच दादांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता मात्र त्यात त्यांनी दादांना दोन अटी घातल्या होत्या.
एक म्हणजे लग्नानंतर मी कोंडके आडनाव लावणार नाही आणि दुसरी अट म्हणजे लग्नानंतर माझ्या फ्लॅटवर राहायला यायचं. या दोन्ही अटी पाहून दादा कोंडके विचारातच पडले. हा गुंता सोडवण्यासाठी ते कोल्हापूरला असलेल्या भालजी पेंढारकर यांच्याकडे गेले.तेव्हा भालजी पेंढारकर यांनी दादांना विश्वासात घेऊन अजिबात लग्नाच्या भानगडीत पडू नकोस असा मोलाचा सल्ला दिला. दादांनी गुरूंचा हा सल्ला ऐकला आणि आशा भोसले यांना लग्नासाठी नम्रपणे नकार दिला. नंतर मात्र दोघांच्याही भेटीगाठी कमी झाल्या. केवळ व्यावसायिक कारणासाठी त्यांची भेट घडून येत असे. यानंतर आशा भोसले यांनी आर डी बर्मन यांच्याशी संसार थाटला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button