Bollywood

Bollywood: अमीर खानच्या लेकीच्या लग्नाची स्वतः अमीरने केली जाहीर.. ह्या दिवशी मराठमोळ्या तरुणा बरोबर अडकणार विवाह बंधनात

Bollywood: अमीर खानच्या लेकीच्या लग्नाची स्वतः अमीरने केली जाहीर.. ह्या दिवशी मराठमोळ्या तरुणा बरोबर अडकणार विवाह बंधनात

अभिनेता आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख ठरली आहे. महत्त्वाचं म्हणजे खुद्द आमिरनेच आयराचं लग्न कधी होणार याबाबत माहिती दिली आहे. आयरा व नुपूर शिखरे यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी साखरपुडा केला होता. आता वर्षभराने दोघेही लग्नबंधनात अडकतील. दोघांचं लग्न नवीन वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणार आहे, असं आमिरने सांगितलं आहे.

नुकतेच माध्यमांशी आमिरने मुलीच्या लग्नाची तारीख सांगितली. इतकंच नाही तर त्याने होणाऱ्या जावयाचं तोंडभरून कौतुकही केलं. “आयरा ३ जानेवारीला लग्न करणार आहे. मुलगा तिने निवडलेला आहे. खरं तर त्याचं निकनेम पोपोये आहे, तो ट्रेनर आहे. त्याचे नाव नुपूर आहे. तो खूप छान मुलगा आहे. जेव्हा आयरा नैराश्याशी लढत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. तो खरोखरच तिच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला. मला आनंद आहे की तिने एक असा मुलगा निवडला ज्याच्याबरोबर ती खूप आनंदी आहे. ते खूप कनेक्टेड आहेत. ते एकमेकांची खूप काळजी घेतात,” असं आमिर म्हणाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button