Maharashtra

मा. संपतराव गायकवाड : एक दीपस्तंभ- राजेंद्र कुमार गोंधळी

मा. संपतराव गायकवाड : एक दीपस्तंभ– राजेंद्र कुमार गोंधळी


सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिक, नि:स्वार्थ जीवन जगणारे आजच्या काळात खूपच अपवादात्मक दिसतात. आदरणीय संपतराव गायकवाड साहेब हे त्यांपैकी एक. शिक्षक, अधिकारी म्हणून काम करतानाही आणि सेवानिवृत्तीनंतरही माणुसपणाचं कर्तव्य त्यांनी कधीही सोडलं नाही. त्यांचे व्रतस्थपणे जगणे समाजातल्या प्रत्येकाला माणुसकीची दिशा दाखवणारे आहे. विशेष म्हणजे पदाचा, बुद्धिमत्तेचा कोणताही आविर्भाव न दाखविता काम करत राहणं ही गायकवाड साहेबांची सहजप्रवृत्ती. साहित्यात रमणारा, आईची माया उलगडून दाखविणारा, संवेदनशीलतेने कर्तव्य पार पाडणारा, समाजाशी नाळ जोडणारा, सहवासातील प्रत्येकाला प्रेरणेचा स्पर्श देणारा, आपल्या अमोघ वाणीतून भावनेचा ओलावा सांडणारा, प्रचंड स्वावलंबी आणि एक सच्चा माणूस म्हणजे संपतराव गायकवाड. वाचन, वक्तृत्त्व, सूक्ष्म निरीक्षण, चांगल्याचे तोंड भरून कौतुक करणारे मनाचे औदार्य, चुकीबद्दल कानउघाडणी करणारे स्पष्ट व पारदर्शी मन आणि कुटुंबवत्सल साधी राहणी अशा अनेक सद्गुणांचा संचय असणारे गायकवाड साहेबांचे व्यक्तिमत्त्व त्रिकाल वंदनीय आहे. आजच्या समाजास अशा विभूतींची नितांत आवश्यकता आहे. *आज आदरणीय संपतराव गायकवाड साहेबांचा वाढदिवस. त्यांना वाढदिनी मन:पूर्वक शुभेच्छा !! सुखी, समृद्ध, आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !!* - *राजेंद्रकुमार गोंधळी (कोल्हापूर)*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button