sawada

थाट या शब्दाला मागे सोडून सावदा येथे संपन्न झाला एक आदर्श लग्न सोहळा

थाट या शब्दाला मागे सोडून सावदा येथे संपन्न झाला एक आदर्श लग्न सोहळा

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील रहिवासी वर व वधूच्या घरातील मंडळीने थाट या शब्दाला मागे सोडून थेट वधू मंडळी कडून ५ व वर मंडळीचे ५ असे एकूण १० लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने लग्न सोहळा पारपाडून थेट समाजाला एका विशिष्ट प्रकारचा आरसा दाखवण्याचा कौतुकास्पद कार्य सदर लग्नाच्या निमित्ताने केला आहे.या कार्यक्रमात जेवण ऐैवजी फक्त शितपेयची व्यवस्था होती.

याबाबत अधिक माहिती अशी, सावदा शहराचे सुप्रसिद्ध फारुख खान आयुब खान उर्फ भिकन सेठ यांची सुकन्या आलिया बी सोबत आसिफ खान अजमल खान यांचे पुत्र फैइयुम खान यांच्या लग्न अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने वर वधूच्या मंडळीत आपसात ठरल्याप्रमाणे आज दि.२५/७/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता ईस्लामपुरा या भागात कोणताही थाट व देखावा न करता थेट इस्लाम धर्माच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर सं.अ यांनी लग्न करणे संदर्भात सर्वांना अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने करावे.जेणेकरून गोरगरिबांना लग्न कार्यपद्धती अवघड जाऊ नये १४०० वर्षापूर्वी संपूर्ण जगाला दिलेली अशी अतिशय चांगली व सुंदर शिकवणचे अनुकरण करून ह्या वधू व वरा कडील मंडळीने सदरील लग्न संपन्न केल्याचे कौतुकास पात्र अशा लग्न सोहळा पार पाडल्याचे दिसून आले.तरी या लग्न सोहळ्यापासून समाजातील सर्व घटकांनी बोध घेणे गरजेचे आहे.याप्रसंगी मुजफ्फर खान अजमल खान, फारुख खान आय्युब खान, आशिक खान अयुब खान,आली हैदर सर,सह वर वधू या दोघांचे घरातील ठराविक महिला उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button