Aurangabad

हिरडपुरीत मोठ्याप्रमाणात वाळू साठा जप्त, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची कारवाई

हिरडपुरीत मोठ्याप्रमाणात वाळू साठा जप्त, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची कारवाई

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील हिरडपुरीतून वाळू चोरी संबंधात अनेक तक्रारी प्राप्त आहेत. यासाठी प्रशासनाकडून योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. मात्र, या कामात ग्रामस्थांनी दक्ष नागरिकाची भूमिका बजावून प्रशासनास योग्य माहिती देण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्रशासन तुमच्यासोबत असून गावातील प्रत्येकाने कलेक्टर मित्र म्हणून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हिरडपुरी येथे केले. पैठण येथील मोक्षघाट, नवेगाव, भिवरन्याय आणि हिरडपुरी येथील नदीपात्रातील वाळू चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी चव्हाण यांना प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींची गांभीर्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दखल घेत थेट पैठण तालुक्यातील गोदापात्रातील गावांना भेट देऊन नदी पात्रातील पाहणी केली. ग्रामस्थांनाही मार्गदर्शन करत संवाद साधला. घरकुल, वीज जोडणी, कृषी पंप जोडणी, बचत गटांना साहाय्य, कौशल्य विकासातून प्रशिक्षण, पाणी पुरवठा, अन्न धान्य पुरवठा आदींबाबत ग्रामस्थांना विचारपूस करत प्रशासन जनतेसोबत असल्याचा विश्वास ग्रामस्थांना दिला. त्याचबरोबर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले. ग्रामस्थांनी देखील वाळू उपसा करणाऱ्या विरोधात एकत्र येत गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना देखील केल्या. यावेळी त्यांच्यासोबत उप विभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, गोरख भामरे आदींसह महसूल, पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button