Amalner

विश्वासराव वामन पाटील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त..

विश्वासराव वामन पाटील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त

अमळनेर- मुडी येथील ग्रामविकास शिक्षण संस्था संचलित भिकारी सदाशिव हायस्कूल कोळपिंप्री शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव वामनराव पाटील हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून आज दि ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

त्यांनी ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या सर्व शाळांमध्ये प्रामाणिक सेवा दिली.सुरवातीचा काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले व सेवाजेष्ठते नुसार त्यांना मुख्याध्यापक या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी सुद्धा प्रामाणिक काम करून ते आज सेवानिवृत्त झाले आहेत . त्या बद्दल ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संस्थेचे अध्यक्ष,सचिव, कायम संचालक, सदस्य, पदाधिकारी, व सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button