Marwad

मारवड पोलीस ठाण्यात अपहरण चा गुन्हा दाखल

मारवड पोलीस ठाण्यात अपहरण चा गुन्हा दाखल

अमळनेर नूरखान

मारवड पो स्टे कडील निभोंरा गावातील मुलगी ही दि.29-5-20 रोजी दुपारी 15:00 वाजता संडासला जाते सांगुन तिचे आजीच्या घरातुन निघून गेली असता दि.2-6-20 रोजी शाळेच्या दाखल्यावरून मिसिंग दाखल केली व मुलीचे जन्म तारखेबाबत आधार कार्ड, स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट व ग्राम पंचायत दाखला यात तफावत असल्याने ग्राम पंचायत कडे खात्री करता त्यांनी रेकाॅर्ड पडताळून ती अल्पवयीन असल्याबाबत कागदपत्र दिल्याने व ती आज पावेतो घरी परत आली नाही, तसेच गावातील मुलगा खुशाल राजेंद्र पारधी हा सुध्दा नमूद दिनांकापासून गावात नसल्याने त्याचेवर संशय व्यक्त करून वगैरे मजकूराची फिर्याद आज दिल्याने गुरनं.36/20 भादंवि.क.363 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.राहुल फुला सपोनि यांचे मार्गदर्शन खाली सफौ संतोष पवार, सफौ किशोर पाटील पोना 314 अगोणे,पोना 935 होळकर, पोना 277 कुलकर्णी, पोशि 2020 तेली असे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button