मारवड पोलीस स्टेशन हद्दीतील जैत पीर येथे गावठी दारू अड्ड्यावर छापा
मारवड पो स्टे हद्दीतील जैतपीर या गावी इसम नामे
१) गणेश दशरथ कोळी रा.जैतपीर याचे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर छापा मारुन रु.४८००/- किंमतीचा मुद्देमाल त्यात हातभट्टी, तयार दारु व कच्चे रसायन असा माल पकडुन जागीच नष्ट केला,
तर इसम नामे
२) पांडुरंग हिरामण कोळी रा.जैतपीर याचे गावठी दारु हातभट्टी दारु अड्डयावर छापा मारुन रु.३६००/- चा मुद्देमाल त्यात गुळ मिश्रीत कच्चे रसायन, हातभट्टी व तयार दारु असा माल पकडुन जागीच नष्ट केला आहे दोन्ही आरोपींविरुध्द प्रो.गुरनं. १०/२० व ११/२० प्रमाणे गुन्हे दाखल केले.
सदर कारवाई दरम्यान राहुल फुला, सपोनि, पोना १४० फिरोज बागवान, पोना २३५५ भास्कर तव्हाण, पोना ३१४ सुनिल अगोणे, पोना ८३३ सचिन निकम, पोशि २०२० सुनिल तेली आणि पोना दिनेश कुलकर्णी असे पोलीस पथक होते व पोलीस पाटील गोविंदा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.