Pune

पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करावे-अंकिता पाटील

पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करावे-अंकिता पाटील

दत्ता पारेकर पुणे

पुणे : पत्रकारांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी विनंती पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
या पत्राद्वारे अंकिता पाटील म्हणतात की,’ मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रात उद्भवलेल्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीला आपण सगळेच सामोरे जात आहोत. दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ती नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर, नर्स, महानगरपालिका कर्मचारी, पोलीस यंत्रणा आदी फ्रंटलाईन वर्कर्स सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच सरकार म्हणून आपण देखील अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील आहात.

मात्र या सगळ्यामध्ये आणखी एक वर्ग असा आहे, जो आपल्या जीवाचीही पर्वा न करता फिल्डवर उतरून काम करत आहे.कोरोना काळात पत्रकार प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. धोका पत्करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. दरम्यान, कोरोनाची लागण अनेक पत्रकारांना देखील झाली तर काहींचा यामुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला. मात्र असे असतानाही पत्रकारांना अद्याप कोरोनाची लस मिळालेली नाही.

त्यामुळे फिल्डवर जाऊन वृतांकन करताना पत्रकारांवर एक भीतीचे सावट असल्याचे दिसत आहे.देशात आणि राज्यात कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. इतर फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणेच पत्रकारांनाही प्राध्यान देऊन त्यांना लस दिली जावी, अशी मी आपणास विनंती करते.अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व युवारत्न अंकिता पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button