India

आरोग्याचा मुलमंत्र…खा पांढरा कांदा, आरोग्याचा नाही होणार वांधा…

आरोग्याचा मुलमंत्र…खा पांढरा कांदा, आरोग्याचा नाही होणार वांधा…

गावाकडे पांढरा कांदा हा आवडीने खाल्ला जातो. काही ठिकाणी हा कांदा अतिशय तिखट असल्यामुळे त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जात नाही. पांढऱ्या कांद्यामध्ये बॅक्टरीयाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अनेक आजरांपासून सरंक्षण होण्यास मदत होऊ शकते. पांढऱ्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, फॉलीक ऍसिड तसेच सी जीवनसत्व याचे प्रमाण जास्त असते. पांढरा कांदा पोटाच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. ज्या लोकांना रक्तदाबाच्या समस्या आहेत, त्या लोकांनी दररोज एक कच्चा कांदा खाल्ला तर फायदेशीर राहतो.
पांढऱ्या कांद्याचे कोणते गुणधर्म आहेत, ते जाणून घेऊया …

पुरुषांसाठी रामबाण –
पांढऱ्या कांद्याचा उपयोग वीर्य वाढीसाठीही केला जाऊ शकतो. पांढऱ्या कांद्याचे मधासह सेवन केल्यास आरोग्यास भरपूर लाभ मिळतात. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे नैसर्गिक स्वरुपात स्‍पर्म वाढवण्याचे कार्य करतात.

हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं –
पांढऱ्या कांद्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट असतात. तसंच यात जळजळ कमी करणारे घटकह देखील असतात. यामुळे कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी होऊन हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. ज्या लोकांना उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पांढरा कांदा अधिक गुणकारी ठरतो. पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं आणि ब्लड क्लॉटिंग होत नाही.

झोपेसाठी आहे चांगला –
एका संशोधनानुसार, पांढऱ्या कांद्यात एल ट्राईप्टोफेन हा घटक असतो. हा घटक झोपेच्या समस्येवर गुणकारी असतो. त्यामुळे पांढऱ्या कांद्याच्या सेवनाने झोपेची समस्या सुटू शकते आणि स्ट्रेस कमी होतो. जर तुम्ही दररोज आहारात पांढऱ्या कांद्याचा समावेश केला, तर तुम्हाला स्ट्रेस फ्री होऊन चांगली झोप लागेल आणि यामुळे मेंटल हेल्थ चांगली राहिल.

पचनसंस्थेमध्ये सुधारते –
पचनासंबंधी आजारापासून सुटका करायची असेल तर पांढरा कांद्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्सचे गुण असतात. त्यामुळे ते पोटासाठी हेल्दी असतात. यामध्ये प्रीबायोटिक्स सारखे अनेक तत्व असतात त्यामुळे आपल्या आतड्यामधील चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते.

हाडे मजबूत –
वाढत्या वयानुसार हाडे देखील कमजोर होत आहे. हाडांना मजबूत करण्यासाठी कांद्याचे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी देखील कांदा महत्वाची भूमिका बजावतो.रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत – पांढऱ्या कांद्यामध्ये सेलिनियम असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असलेल्या भाज्यांमध्ये कांदा सर्वाधिक चांगला आहे.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button