Amalner

?अमळनेर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा चिलम तंबाखू इस घरकू.. खो खो खेळ…रस्त्यांची दुर्दशा..नागरिक हैराण…

अमळनेर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा खो खो खेळ… नागरिक हैराण…

असंख्य कोरोना विषाणू अमळनेर च्या रस्त्यांवरून चालत गेल्यामुळे पडले खड्डे…!!!!!

अमळनेर येथील रस्ते अत्यन्त खराब अवस्थेत आहेत. शहरात असा एकही रस्ता नाही ज्या वर खड्डे नाही.या शहराची ओळख खड्ड्यांचे शहर म्हणून आता नव्याने होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अमळनेर नगरपरिषद मात्र रस्त्यांच्या दुरूस्ती कडे दुर्लक्ष करत खो खो खेळत आहेत. हे काम आमचं नाही नगरपरिषदेचे आहे असे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगते आणि शहरातील मुख्य रस्ते आणि रा महामार्ग असलेले प्रमुख रस्ते ज्यावर जास्त खड्डे आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात आहेत ते दुरुस्त करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे असे अमळनेर नगरपरिषदेचे म्हणणे आहे.

आता या चिलम तंबाखू इस घरकू या खो खो च्या वादात अमळनेरकर मात्र हैराण झाले आहेत.अमळनेर शहरातील 80% जनता ही नियमित कर भरणारी आहे आणि रस्ते गटारी स्वच्छता ह्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसतील तर जनतेने कर भरून आणखी स्वतःची हाडे मोडून घेण्यासाठी या रस्त्यांवरून कसे आणि कोणत्या पद्धतीने जावे मार्गक्रमण करावे असा खूप च मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

नगरसेवक तर राजकीय कोरोना झाल्या मुळे कोरेन्टाईन आहेत गेल्या 3 वर्षांपासून त्यांचा बिचाऱ्यांचा काही संबध नाही आपल्या वॉर्डातील समस्यांशी…ते गरीब बिचारे फक्त मत मागण्यापूरता येतात आणि आपापल्या घरी निमूट पणे शांततेत वास्तव्य करतात.ते कोणाच्या घेण्यात नाही आणि देण्यात ही नाही…त्यांचा या विषयाशी दूर दूर पर्यंत काही संबध नाही…अत्यन्त गरीब आणि समजूतदार….

आता या सर्व वादात नागरिकांनी कोणाकडे तक्रार करावी की जेणे करून रस्त्यांची अवस्था बदलेल आणि लोकांची हाडे तुटणार नाहीत…हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.. दाद कोणाकडे मागावी असा स्पष्ट प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत…’

तेरी भी चूप मेरी भी चूप असा साटे लोटे कारभार चालला आहे…जनतेला फक्त उत्तर हवं आहे आणि हे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभाग देईल की अमळनेर नगरपरिषद? आता हे काळच ठरवेल…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button