Usmanabad

क्वारंटाईन सेंटर मध्ये सोयींचा अभाव प्रशासनाचे दुर्लक्ष,उत्कर्ष फाउंडेशन ची तक्रार

क्वारंटाईन सेंटर मध्ये सोयींचा अभाव प्रशासनाचे दुर्लक्ष,उत्कर्ष फाउंडेशन ची तक्रार

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरात विविध ठिकाणी सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणा मध्ये ठेवण्यात येत आहे या नागरिकांना करण्यात आलेले आहे..

तेथे मात्र सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले आहे या या सेंटरवर पिण्याचे पाणी नाही,बाथरुमचे दरवाजे तुटलेले आहेत,वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत नाही तसेच अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण येत आहे अशा विविध तक्रारी आता क्वारंटाईन झालेले नागरिक करू लागले आहेत…

याबाबत उत्कर्ष फाउंडेशन च्या अध्यक्ष उज्ज्वला अंगरखे यांनी पत्रकार सलमान मुल्ला यांच्याशी संपर्क साधून प्रशासन ज्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे त्यांना योग्य त्या सोयी सुविधा देत नाहीत अशी तक्रार केली आहे….

याबाबत तहसीलदार अस्लम जमादार यांच्याशी पत्रकार सलमान मुल्ला यांनी संपर्क साधला असता त्यांनी कळंब शहरातील कल्पना नगर व मुलींचे शासकीय वस्तीगृहातील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन सेंटर मध्ये पुरवल्या जात असलेल्या सुविधांची, रुग्णांची संख्या याची पहाणी केली. क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णाच्या सुविधामध्ये कसल्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस दिल्या.अशी माहिती तहसीलदार अस्लम जमादार यांनी दिली आहे..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button