Usmanabad

उस्मानाबाद तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश , दोघांचा शोध सुरू

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे नदी – नाले भरून वाहिल्याने तालुक्यातील बोरगाव आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन व्यक्ती वाहून गेले आहेत .

त्यांचा शोध घेण्याचे काम रात्रीपासून विविध यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे , अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे .
उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे – बोरखेडा रस्त्यावरील ओढ्यातून बोरखेडा येथील ओढ्यावरील पुलावरून जाताना समीर युन्नूस शेख ( वय 27 ) हे वाहून गेले आहेत . श्री शेख हे मोटरसायकलवर होते एका शेतकऱ्याने त्यांना पाण्यात जाण्यास मनाई करूनही वाहत्या पाण्यात गेल्यामुळे ते वाहून गेले .गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.अद्याप त्यांना शोध लागला नाही…
.
पोलीस, महसूल , नगरपरिषद आणि उस्मानाबाद फायर ब्रिगेडची टीम पाठवण्यात आली आहे .

समुद्रवाणी या गावातील पुलावरून एक इंडिका कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघे जण होते . त्यापैकी दोघे पाण्याचा अंदाज घेण्यासाठी उतरले होते तर दोघे कारमध्ये होते . वाहून जाणाऱ्या कारमधील मेढा येथील गोवर्धन विष्णू ढोरमारे ( वय ५५) आणि बाबा विश्वनाथ कांबळे या दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात यश आले आहे .

दरम्यान , समुद्रवाणी येथे पूर पाहण्यास गेलेला एक व्यक्ती पुरात वाहून गेला आहे . तो अद्याप सापडलेला नाही .त्यांचाही शोध घेण्याचे कार्य सुरू आहे , असेही तहसीलदार श्री . माळी यांनी सांगितले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button