Usmanabad

उस्मानाबाद:-कोंडच्या बस स्थानकाला पानपट्यांनी घेरलं !

उस्मानाबाद:-कोंडच्या बस स्थानकाला पानपट्यांनी घेरलं !

सलमान मुल्ला उस्मानाबाद

उस्मानाबाद : तालुक्यातील कोंड येथील बस स्थानकाला पानपट्यांनी घेरल्यामुळे बस वळवणे ड्रायवरला अवघड झाले आहे.
याबाबत अधीक माहीती अशी की कोंड येथे औसा ,उस्मानाबाद आगाराच्या जवळपास दिवसात २५ फेर्या मारतात गावात तळ्याजवळ नवीन बस स्थानक तयार केले आहे.त्या ठिकाणी बस वळवण्यासाठी जागा मोकळी करण्यात आली होती परंतू सध्या त्या ठिकाणीही बस वळवण्यासाठी अडचणीत वाढ होत आहे.
बस स्थानक परीसरात पानपट्यांनी विळखा घालून रस्त्यामध्ये अडथळा निर्माण केला आहे.
सदर अडचणी स्थानीक प्रशाससनाने दुर करणे गरजेचे आहे.जर वेळीच या अतिक्रमणावर आवर नाही घातला तर भविष्यात बस परत गावापासून एक किलोमिटर अंतरावरुन वळवल्या जातील अशी माहिती परिवहन विभागाकडून समजली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button