Ausa

गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल उन्हाच्या झळा वाढू लागल्या

गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल उन्हाच्या झळा वाढू लागल्यालातुर प्रतिनिधी-प्रशांत नेटकेठोस प्रहार वृत्तसेवा:- औसा तालुक्यातील ग्रामीण भागात थंडी आता पूर्णपणे ओसरली असून ,उन्हाच्या झळा सगळीकडे चांगल्याच जाणवू लागल्या आहेत.उन्हाचा पारा चढण्यास सुरुवात झाली असून गरिबाचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढत आहे. कुंभार व्यवसायिकांच्या वर्षभर केलेल्या अपाट कष्टानंतर बनविण्यात आलेल्या माठांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. औसा तालुक्यातील ग्रामीण भागातील ठिकठिकाणी माठ विक्रीसाठी दुकाने थाटली असून खरेदीचा जोर वाढत आहे.गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल उन्हाच्या झळा वाढू लागल्यात्यामुळे नागरिकांना आता थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. दरवर्षीप्रमाणे ‘गरिबांचा फ्रिज’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या
माठाचे बाजारात आगमन झाले
आहे. मात्र, माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत दुपटीने वाढ झाल्याने यंदा माठाचे दर जवळपास १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.औसा तालुक्यातील ग्रामीण भागात
लहान-मोठ्या आकारातील लाल, काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून, नागरिकांतून चांगली मागणी आहे. होळीनंतर माठांची मागणी वाढली असून, या बाजारात तेजी येईल, असा माठ व्यावसायिकांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button