चंद्रपूर

किसान मित्र संस्था नेरी द्वारा बचत गटातील महिलांना उद्योग प्रशिक्षण

किसान मित्र संस्था नेरी द्वारा बचत गटातील महिलांना उद्योग प्रशिक्षण

राजेश सोनुने

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जी.चंद्रपूर यांच्या वतीने सिंदेवाही जि.चंद्रपूर येथे दिनांक 5 नोव्हेंबर 2019 रोज मंगळवारला नाबार्ड पुरस्कृत ईशक्ति व जे.एल.जी.प्रकल्पा अंतर्गत नोंदणी झालेल्या बचत गटातील महिलांना मार्गदर्शन व उद्योग प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले. या प्रशिक्षनात मा.ए.एल.तेले साहेब सहायक प्रपन्धक नाबार्ड चंद्रपूर, मा.एस.एन.दुबे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर जिल्हा मध्य.सहकारी बँक चंद्रपूर, मा.पी.जी.रामटेके साहेब विदर्भ कोकण ग्रामीण बँक पळसगाव, मा.मोहन अढाऊ साहेब विदर्भ कोंकण ग्रामीण बँक सिंदेवाही, मा.चैताली वाघ उद्योग प्रशिक्षक वर्धा,मा.पुरुषोत्तम वाळकेअध्यक्ष किसान मित्र संस्था नेरी चंद्रपूर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रशिक्षणात मा.एस.एन.दुबे साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात बचत गटातील महिलांनी उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन उद्योग निर्मिती करावी व आर्थिक स्वावलंबी बनावे असे मनोगत व्यक्त केले, तर मा.ए.एल.तेले साहेब यांनी नाबार्ड च्या विविध योजना व बचत गटातील महिलांनी पंचसुत्री चा वापर करून गटात सक्षमता निर्माण करावी असे आव्हान केले.मा.पुरुषोत्तम वाळके यांनी ईशक्ती व जे.एल. जी.गटाबाबतची संकल्पना व कर्ज धोरण या विषयी मार्गदर्शन केले. महिलांना उद्योग प्रशिक्षण मा.चैताली वाघ व पुरुषोत्तम वाळके यांनी प्रात्यक्षिकसह दिले या मध्ये

1)वॉशिंग पावडर.2)फिनाईल. 3)हँड वॉस. 4)ग्लास क्लीनर. 5) टॉयलेट क्लीनर. 6)परफ्युम सेंट. 7)बर्तन क्लीनर. 8)नीळ बनविणे या उद्योगाचे प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण देण्यात आले . या प्रशिक्षणाचे आयोजन जयस्वाल सभागृह बस डेपो समोर सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे करण्यात आले.कार्यकर्माचे सूत्र संचालन नितेश ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल महाडोरे व जगदीश पाटील यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याशाठी मंदा खोब्रागडे,श्रुती बोरकर, ज्योती पोपटे, विनोद चौधरी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला सिंदेवाही, खातगाव, वासेरा, मोहाडी, पवनाचक,भेंडाळा,पळसगाव, येथील बचत गटातील महिलां सहभागी होत्या. ईतर बचत गटांना उद्योग प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांनी सम्पर्क साधावा श्री पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष मोबा.9421707602 व अनिल महाडोरे यांच्या कडे करावे . किंव्हा संस्थेचा पत्ता : C/O गुरुदेव पत संस्था बिल्डिंग नेरी (चिमूर ) जिल्हा. चंद्रपूर येथे संपर्क साधावा.

वरील उद्योग साहित्य अल्पदरात 2000 रुपयात विक्री करीता संस्थेत उपलब्ध आहेत. असे पत्रकांद्वारे पुरुषोत्तम वाळके यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button