Ratnagiri

सुशिलकुमार पावरा यांना “मानव विकास राज्य पुरस्कार”

सुशिलकुमार पावरा यांना “मानव विकास राज्य पुरस्कार”

रत्नागिरी:सामाजिक व शैक्षणिक श्रेञात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना यंदाचा “मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार 2021” जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी हा पुरस्कार मानव विकास संस्था लातूर,महाराष्ट्र राज्य यांच्या कडून देण्यात येतो.यापूर्वी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Organization for National level Art Competition’s Mumbai maharashtra तर्फे दिनांक 25/08/2017 रोजी जिल्हा परिषद शाळा सुकदर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे सुशीलकुमार पावरा यांना “राष्ट्रीय कला मिञ” पुरस्कार देण्यात आला होता. सुशिलकुमार पावरा हे एक कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून लाॅकडाऊन कालावधीत गरीब व गरजू लोकांना धान्य वाटप करणे, होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षांचे आयोजन करणे,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे,सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, समाजातील वाईट प्रथांचा जाहीर विरोध करणे, समाजातील लोकांच्या हक्क व अधिकार साठी शासनदरबारी पाठपुरावा करणे,अन्याय ग्रस्त विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांना न्याय मिळवून देणे,अन्याय ग्रस्तांना मदत करणे,शैक्षणिक व सामाजिक जागृती करणे,समाजातील ज्वलंत विषय हाताळून सोडवणे,प्रशासनाला निवेदन देणे इत्यादी सामाजिक व शैक्षणिक क्षेञात उल्लेखनीय काम केलेले आहे. तसेच सुशिलकुमार पावरा यांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात तब्बल 126 पेक्षा अधिक वेळा उपोषण व आंदोलन केली आहेत.या त्यांच्या संघर्षाची दखल घेत मानव विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सुशीलकुमार पावरा यांना यंदाचा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करीत असल्याचे आयोजकांनी फोनद्वारे कळविले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा लातूर येथे मार्च महिन्यात होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला येणारे मंञी व मान्यवरांच्या हस्ते सुशिलकुमार पावरा यांना आपल्या सपत्नीसह, परिवारासह गौरविण्यात येणार आहे.
हा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्धल सुशिलकुमार पावरा यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बिरसा क्रांती दल संघटनेने विशेष अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button