Maharashtra

येत्या दहा दिवसात लोकसहभागातून पन्नास बेडची तातडीची व्यवस्था उभारू – खासदार उन्मेश दादा पाटील याचे सर्वपक्षीय बैठकीत प्रतिपादन

महात्मा फुले जन आरोग्य संकुलात
येत्या दहा दिवसात लोकसहभागातून पन्नास बेडची तातडीची व्यवस्था उभारू खासदार उन्मेश दादा पाटील याचे सर्वपक्षीय बैठकीत प्रतिपादन

आमदार मंगेश चव्हाण ,नगराध्यक्ष आशालता चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातालकर,तहसीलदार अमोल मोरे तसेच विविध अधिकारी सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्

चाळीसगाव प्रतिनीधी मनोज भोसले

चाळीसगाव — शहर आणि तालुक्याच्या वैभवात भर घालणारा महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रामा केयर सेंटरची भव्य दिव्य वास्तू तयार झाली असून येत्या काळात कोविड च्या अनुषंगाने आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी येथे अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज किमान पन्नास बेडची सुविधा दहा दिवसांत केली जाईल. यासाठी सर्वपक्षीय तसेच सामाजिक संघटना ,दानशूरांची मदत घेऊ.सुरूवातीच्या तीन महिन्यात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून तालुका दूर होता मात्र सध्या परिस्थिती आटोक्यात असली येत्या काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी ही तातडीची व्यवस्था उभारली जाईल असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.आज धुळे रोड शासकीय दूध डेअरीच्या परिसरातील महात्मा फुले जन आरोग्य संकुलात तहसीलदार आयोजित सर्वपक्षीय सामाजिक संघटना, आय एम ए, जनरल प्रॅक्टिशनर,विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारीयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण , प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर,तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. बी पी बाविस्कर, डॉ. सी टी पवार,आय एम ए च्या डॉ.स्मिता मुंदडा, डॉ. दामीनी राठोड, डॉ. मंगेश वाडेकर, डॉ. लीना पाटील डॉ. गिरीश मुंदडा डॉ. विनय पाटील डॉ.अरकडी, डॉ किरण मगर , डॉ पंकज निकुंभ, डॉ. शशिकांत राणा,जनरल प्रॅक्टिस असोसिएशनचे डॉ.महेश वाणी, डॉ. सुजित वाघ ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख महेंद्र पाटील, महावितरणचे संदीप शेंडगे, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी, माजी उपसभापती संजय पाटील,दिनेश बोरसे, नगरसेवक गटनेते संजय पाटील, नगरसेवक श्‍याम देशमुख ,शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव खलाणे,सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे , सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन,रोटरीचे प्रकाश बाविस्कर, संमकीत छाजेड,काँट्रॅकटर एकनाथ चौधरी डॉ. महेश निकुंभ, डॉ. महेंद्र राठोड प्रदीप देशमुख योगेश भोकरे भास्कराचार्य स्कूलचे प्रा.उमाकांत ठाकूर ,राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक विश्वास चव्हाण उद्योगपती राज पुंशी, नायब तहसीलदार विशाल सोनवणे,पत्रकार देवीदास पाटील उमेश बर्गे, मनोहर कांडेकर ,रमेश जानराव, मंगेश शर्मा ,सुनील राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले लवकरात लवकर लोकसहभागातून ही व्यवस्था उभारावी असा मानस आहे. यासाठी लागणाऱ्या आरोग्य उपकरणे, साधनसामुग्री , साहित्य याची त्वरित उपलब्धता व्हावी. आणि 150 रुग्णांना क्वारंटाईन करता येईल.या दृष्टीने नियोजन करावे असे ते म्हणाले आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले की ही वास्तू उभी राहावी यासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केलेले प्रयत्न तालुका वासीयांच्या सदैव स्मरणात राहतील .येत्या काळात जी मदत ही व्यवस्था उभारणी करिता लागेल त्यासाठी मी तयार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आय एम ए आणि जनरल प्रॅक्टि शनr असोसिएशन सर्वोत्तपरी मदत करायला तयार आहे असे
डॉ स्मिता मुंदडा यांनी सांगितले तर सगळ्यांनी दातृत्व दाखवून योग्य ती मदत करायचे जाहीर केले आहे. या सर्वांचे मी आभार मानतो असे डॉ. मंगेश वाडेकर यांनी भावना व्यक्त केली. ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि ज्या इच्छुकांनी या कोविड केंद्रात काम करण्याची इच्छा आहे.अशा इच्छुकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रास्तविक प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी तर सूत्र संचालन डॉ. बी पी बाविस्कर यांनी केले. तहसीलदार अमोल मोरे यांनी आभार मानले.

*कोविड वॉर रूम तयार करा..*

कोविड माहिती कक्ष स्थापन करून शहरातील व ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या रुग्णांची माहिती ,त्यांच्या दैनंदिन रिपोर्ट, कुठे ऍडमिट केले आहे, जळगावला पाठवण्यात आले आहे, पेशंटची प्रकृती व सद्यस्थिती ची माहिती देण्यासाठी एकाच सेंटरवरून माहिती देण्यात यावी या कक्षात जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी , तेथून अशी सर्व एकत्रित माहिती एकाच ठिकाणी मिळावी याकरिता तातडीने मदत कक्ष स्थापन करून तेथून सर्व माहितीचे आदान-प्रदान व्हावे. जेणेकरून यंत्रणेचा मोबाईल वर बोलण्यात अधिक वेळ जाणार नाही व जनतेची देखील योग्य पद्धतीने सोय होईल. अशी तातडीने उपाययोजना करावी असे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button