Amalner

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेकडो शेतकरी उद्या  धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयात..!लोकप्रतिनिधींनी सोडले वाऱ्यावर..लढतील शेतकरी आता आपल्याच दमावर..!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेकडो शेतकरी उद्या धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयात..!लोकप्रतिनिधींनी सोडले वाऱ्यावर..लढतील शेतकरी आता आपल्याच दमावर..!

अमळनेर येथे कमी पावसामुळे दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निम्मे पेक्षा देखील कमी पाऊस झाला आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.70% पेरण्या ह्या आता पर्यंत झाल्या आहेत. आणि आता पावसाने पाठ फिरवल्या मुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. आधीच कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन काळात सर्वच हाथ थांबले आहेत.आणि आता पाऊस न पडल्या मुळे पेरण्या वाया जात आहेत. पिके करपू लागली आहेत. लोक प्रतिनिधी आपल्याच कामात व्यस्त आहेत.कुणीही ह्या विषयावर बोलायला तयार नाही.आता पर्यंत एकही आढावा बैठक घेण्यात आलेली नाही.सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हे मुंबई वाऱ्या,भूमिपूजने,उद्दघाटने ह्यात व्यस्त आहेत तर भारतीय जनता पक्षाचे नेते फक्त पदे वाटण्यात ,आघाड्या घोषित करण्यात धन्यता मानत आहेत.विरोधी पक्षनेते असूनही कोणतीही ठोस भूमिका आता पर्यंत भारतीय जनता पक्षाने या संदर्भात घेतलेली नाही.भारतीय जनता पक्षात अनेक नेते असून यातील दोन्ही माजी आमदार गायब आहेत.एक जळगावी स्वगृही येऊन जाऊन आहेत तर दुसरे नंदूरबारी मुक्काम ठोकून आहेत.यामुळे शेतकऱ्यांचा कुणीही वाली उरलेला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

राजकीय नेत्यांची शेतकरी प्रश्नांबाबत ची अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे मारवड मंडळ मधील शेकडो शेतकरी स्वतःच स्वतःचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहेत. तिव्र दुष्काळी परिस्थितीत विषयी निवेदन यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात येणार आहे. या परिसरात दुबार तीबार पेरणी लागवड करूनही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी मोठा हवाला दिल झाला असून गुरांसाठी चारा उपलब्ध नाही. शेतकऱयांच्या हातात पैसे नाही आत्ता शेतकऱ्याने जगावे तरी कसे ?

एवढी दुष्काळाची गंभीर परिस्थती असूनही भूमीपुत्राने मारवड मंडळात येऊन शेतक्यांची शेती बांधावर जाऊन विचारपूस ही केली नाही.या परिसरातील शेतकऱ्यांनी दोनवेळा निवेदन दिले. मात्र आमदाराला अजूनही शेतकरी विषयी जराही कीव येत नाही का? आद्यप पर्यंत ऑगस्ट महिना लागून गेला तरी परिसरात पाऊस नाही हे भूमीपुत्राला दिसत असून का डोळे झाक करीत आहेत का ? मारवड मंडळात भीषण दुष्काळ परिस्थिती असतांनाही अधिकारी व लोकप्रतिनिधी परिसरात आद्यपही आलेच नाही..

श्यामकांत बळीराम पाटील गोवर्धन अध्यक्ष अमळनेर तालुका को ऑफ फ्रूटसेल सोसायटी

मात्र खऱ्या अन्न दात शेतकय्रांची वाली कोणीही नाही का? अधिकारी डोळे झाकून बसले आहेत का? पाहणी दौरा,आपत कालीन आढावा बैठका का घेण्यात येत नाहीत? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि हाच जर हवालदिल झाला तर काय परिस्थिती निर्माण होईल? याचा कुणी विचार करेल का असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत.आमच्या प्रश्नांसाठी तुम्हाला वेळ नसेल तर मते मागण्याच्या वेळी प्रत्येक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button