Maharashtra

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा,आडगाव रेपाळ ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा,आडगाव रेपाळ ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-:येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ग्रामसेवक यांना वेळोवेळी तोंडी व लेखी गावातील समस्या संदर्भात कळविले असता गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या कडे कानाडोळा करत दुर्लक्ष करत असल्याने स्वाभिमानी रिपाई वतीने आदोंलन करण्यात येईल अशा इशारा शशिकांत जगताप यांनी पत्रकाद्वारे दिला आहे
गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी गेल्या चार ते पाच महिन्यापासून पाठपुरावा करत असताना निकम वस्ती येथे मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाहीत व गावातील काही भागात पाण्याचा अपव्यय होईल इतके पाणी मिळत असेल आणि काहीना पाण्यापासून वंचित राहावे लागत असेल तर सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष घालून पाईपलाईनीची कुठे तुटफूट झाली की काय याची चौकशी अथवा पाहणी करून पाईपलाईन दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणतेही पाऊल न उचलता कोरोना चे कारण पुढे करून ग्रामपंचायतीने काढता पाय घेऊन आजपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत केलेला नाही
आडगाव रेपाळ ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार या ठिकाणी दिसून येत असून 18 /3/2020, 27 /4/2020 तसेच 11 /5 /2020 रोजी लेखी निवेदन व व्हाटसप च्या माध्यमातून ग्रामसेवक यांना कळविले असता कोणतीही दखल घेतलेली दिसत नाहीत
म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका कोषाध्यक्ष नवनाथ पगारे, प्रहार चे शंकर गायके यांनी गावातील नळ कनेक्शन धारकांची समस्या जाणून घेतल्या नंतर चर्चा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीचे वतीने येतया आठ दिवसात पाणी पुरवठा सुरलीत न केलयास आंदोलनाचा इशारा यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ पगारे, प्रहार चे शंकर गायके शशिकांत जगताप यांनी दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button