Nagpur

नागपुरात ४६.७ वाढत्या तापमनामुळे झाडे जाळायला लागली..

नागपुरात ४६.७ वाढत्या तापमनामुळे झाडे जाळायला लागली..

अनिल पवार

चांपा, ता.२५:नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सूर्य आग ओकत असल्‍याने नागपूरचा पारा सतत वाढत आहे. शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस ची नोंद झाली होती. शनिवारी कमाल ४६.५ तर रविवारी ४६.७ अंश सेल्सिअस ही या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. रविवारी पारा ४६.७ अंशा वर गेल्याने नागपूर ग्रामीण भागात चांगलेच चटके सोसावे लागले.

त्यात यंदा कोरोना संसर्गाच्‍या प्रादुर्भावामुळे प्रत्‍येकजण घरात लॉकडाउन झाला असला तरी सूर्य आग ओकत असल्‍याने उकाडा असह्य होत आहे. गेल्या दोन आठड्यांपूर्वी मधूनमधून पावसाचा शिडकावा होत असला तरी मे महिन्याच्या उन्‍हाळा खऱ्या अर्थाने आता तापायला लागला आहे. वाढत्या तापमानामुळे कुलर ही काम करीत नाहीत, सकाळ च्या आठ वाजता पासून सूर्य आग ओकत असल्याने दुपारी दोन च्या सुमारास अंगाची लाहीलाही होत आहे.

नागपुरात वाढत्या तापमनामुळे अक्षरशः वझाडे जाळायला लागली आहे.त्‍यातच सोमवार (ता.२५) पासून नवतपाला सुरुवात होत आहे. आधीच पारा ४६.५ ते ४६.७ अंशावर गेला असताना नवतपात काय होणार, याची चिंता नागपूरकरांना लागून राहिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button