Delhi

?️Big Breaking..आणि  थोडक्यात बचावल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी..! ताफ्याचा भीषण  अपघात..!

?️Big Breaking..आणि थोडक्यात बचावल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी..! ताफ्याचा भीषण अपघात..!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी या थोडक्यात बचावल्या आहेत. कारण त्यांच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. प्रियंका यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका गांधी थोडक्यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्वरजवळ झाला.

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, विधीमंडळाचे नेते आराधना मिश्रांसहीत अनेक नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर साडेअकराच्या सुमारास ११ वाजता बिलासपूर येथील डिबडिबा गावाला भेट देणार आहेत. येथे प्रियंका नवरीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. प्रियंका यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रामपूर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पोलीस आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रियंका आणि काँग्रेस समर्थकांच्या ५०० गाड्यांचा ताफा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एसपी शगुन गौतम यांनी केवळ रामगोविंद चौधरीच येणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये (Tractor rally) मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या अंत्य संस्काराला जात असताना काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांच्या ताफ्याला अपघात झाला. एका पाठोपाठ अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्यात. सुदैवाने या अपघात प्रियांका गांधी यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

प्रियांका गांधी आपल्या ताफ्यासह आज सकाळी उत्तर प्रदेशातील रामपूरकडे रवाना झाल्या. प्रियांका यांच्या कारच्या वायपरमधील पाणी संपले होते, त्यातच कारची काच धुरकट झाली होती.

प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. गाड्यांचा ताफा महामार्गावर वेगाने रामपूरच्या दिशेने जात असतानाच अचानक प्रियंका गांधी ज्या गाडीत बसल्या होत्या ती गाडी तापल्याने तिच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली. गाडी अचानक थांबल्याने ताफ्यामध्ये मागून येणाऱ्या गाड्यांनी प्रियंका बसलेल्या गाडीला धडक दिली. ताफ्यामधील चार गाड्या एकमेकांना आदळल्या. मात्र या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे समोर काही दिसत नसल्यामुळे चालकाने अचानक ब्रेक मारले. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या कार एकमेकांवर जाऊन आदळल्यात. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना काहीच कळाले नाही, त्यामुळे एकापाठोपाठ गाड्या एकमेकांवर आदळल्यात. या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, गाड्यांचे बरेच नुकसान झाले आहे.

नवी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान रामपूरमधील नवरीत सिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. नवरीत सिंग हा वेगाने ट्रॅक्टर चालवत असताना त्याचा अपघात झाला होता. या अपघातात नवरीत सिंग मृत्युमुखी पडला होता. नवरीत सिंगच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी जात आहे. यावेळी काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित राहण्याची असल्याची शक्यता आहे. सोबतच राष्ट्रीय लोक दल चे नेते जयंत चौधरी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button