Ahamdanagar

कासार पिंपळगाव येथे ग्रामपंचायत आणि प्राथमिक,माध्यमिक शाळेच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न!

कासार पिंपळगाव येथे ग्रामपंचायत आणि प्राथमिक,माध्यमिक शाळेच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान सोहळा संपन्न!

सुनिल /अहमदनगर

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून या वर्षी ७५ वर्षे पुर्ण झाले आहेत. देशसेवा केलेल्या माजी सैनिकां विषयी क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामपंचायत कासार पिंपळगाव आणि दोन्ही शाळेच्या वतीने माजी सैनिकांना सन्मानीत करण्यात आले. यामध्ये विठ्ठल जगताप, अशोक गायकवाड, ज्ञानदेव जगताप, चंद्रकांत कवळे,विक्रम जगताप, नारायण राजळे,दारकुंडे मेजर यांचा समावेश होता. सरपंच सौ.मोनाली ताई राजळे,ग्रामसेवक, प्रमोद म्हस्के, सदस्य, अप्पासाहेब राजळे,द्वारकानाथ म्हस्के, देविदास राजळे,अर्जुन राजळे,अंकुश राजळे, संभाजी राजळे ,भाउपाटील राजळे हे ग्रामपंचायत सोहळ्यास उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या वतीने ही थेट शाळेत माजी सैनिकांना सन्मानित केले.मराठी शाळेचे मुख्याध्यापक मोहन शिंदे, रमेश अकोलकर, उद्धव दौंड, मंदाकिनी लांडगे,मनिषा ढोले,मिना देवढे, वनिता बलफे यांनी प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक सुखदेव गेणूजी म्हस्के, शिक्षिका सौ. विजया गोबरे,मंगल लवांडे, मनिषा जाधव,किर्ती भांगरे,राजश्री दुशिंग,तबस्सुम यांनी तयार केलेल्या शालेय विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने देशभक्ती पर गीतांनी माजी सैनिकांना सलामी दिली. मेजर विठ्ठल जगताप यांना मानाचे स्थान देऊन गौरविण्यात आले. माजी सैनिकांना सन्मानित करण्यासाठी ग्रामपंचायत आणि दोन्ही शाळा यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून देशसेवे बद्दल क्रुतज्ञता व्यक्त केली. छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षक विजय भताने,शिवाजी लवांडे, भागवत आव्हाड, राजेंद्र वांढेकर, शंकर बरकडे,सादिक शेख, देवेंद्र बोडखे,अमोल लवांडे, अभय चितळे,प्रशांत अकोलकर,संजय आठरे,शिंदे, गायकवाड, यांनी विषेश परिश्रम घेतले. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button