Amalner

Amalner: नैराश्य आले आणि त्याने जीवन संपविले..!

Amalner: नैराश्य आले आणि त्याने जीवन संपविले..!

अमळनेर दारूच्या नशेत नैराश्यातून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची
घटना दाजीबा नगरात घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील दाजीबा नगर येथील रहिवासी नाना नरेश चव्हाण याने दारूच्या नशेत नैराश्यातून १२ रोजी रात्री घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल वसंत भिल यांनी दिलेल्या फिर्यादनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हे.कॉ.कैलास पवार करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button